शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अजित डोवाल यांना 'राफेल डील'चा अधिकार होता का?, काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:05 IST

मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल 350 पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन निगोसिएशन टीमचा अहवाल पत्रकार परिषदेमध्ये मांडला.

नवी दिल्ली : राफेल डीलवर एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. राफेल सौद्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून मोदी सरकारच्या 36 राफेलची किंमत युपीएच्या 126 विमानांएवढी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 

काँग्रेसने आज राफेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार पऱिषद घेतली. यावेळी सुरजेवाला यांनी चौकीदाराची चोरी पकडली गेल्याचा दावा केला. मोदींनी भारताच्या तिजोरीला चुना लावला आहे.  इंडियन निगोसिएशन टीमनुसार (आयएनटी) 36 राफेल विमानांची किंमत युरो 8460 दशलक्ष डॉलर बनते. आज युरोची किंमत 80 रुपये आहे. तेव्हाचे 75 रुपये युरोमागे पकडले तर ही किंमत 63 हजार 450 कोटी रुपये होते. मोदी हीच किंमत 7890 दशलक्ष डॉलर 59 हजार कोटी रुपये सांगत फिरत आहेत.

मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल 350 पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. काँग्रेसच्या 126 विमाने खरेदी करताना तंत्रज्ञान हस्तांतरणही नमूद होते. मात्र, मोदींनी 36 विमानांच्या खरेदीमध्ये  तंत्रज्ञान हस्तांतरणालाही बगल दिली आहे. उरलेल्या विमानांनंतर हे हस्तांतरण होणार आहे आणि यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. यातील 10 हजार कोटी रुपये दसॉल्ट कंपनीला देण्यात आले आहेत. 

 36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय 12, 13 जानेवारी 2016 मध्ये अजित डोवालद्वारा फ्रान्समध्ये घेण्यात आला. इंडियन निगोसिएशन टीमने हा निर्णय घेतला नाही. 13 जानेवारीलाच करार करण्यात आला. 2017 मध्ये आलेल्या टिप्पणीमुळे खळबळ माजली होती. पंतप्रधानांनी यावर दबाव आणला आणि पंतप्रधान कार्यालयाने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, आयएनटीच्या अहवालात अंतिम डील आयएनटीने केलीच नसल्याचे म्हटले आहे, असा दावा सुरजेवाला यांनी केला. तसेच जर डोवाल यांनी डील केली तर त्यांना अधिकार होता का? नाही. याचाच अर्थ मोदींच्या प्याद्यांनी हे काम केले. मोदींनी अधिकाराचा गैरवापर करत सरकारी खजिन्याला चुना लावला असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला.

धक्कादायक! राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला

हा गुन्हा गंभीर असून भ्रष्टाचार विरोधी कायदा 13 ए डी चे उल्लंघन केले असून याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसfraudधोकेबाजी