शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वणांच्या आरक्षणासाठी मोदी सरकारची घाई; उद्या विधेयक लोकसभेत सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:15 IST

भाजपाकडून खासदारांसाठी व्हिप जारी; संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक उद्याच लोकसभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून हे विधेयक उद्याच लोकसभेत मांडण्यात येईल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सरकार अधिवेशनाचा कालावधी वाढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंदेखील आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत उद्या लोकसभेत आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक मांडतील. हे विधेयक मंजूर व्हावं, यासाठी भाजपानं खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. तर काँग्रेसकडूनही सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वणांना आरक्षण देण्यासाठी घटनेच्या दोन कलमांमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हे विधेयक भाजपासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. लोकसभेत भाजपाला बहुमत असल्यानं विधेयकाचा मार्ग सुकर मानला जात आहे. मात्र राज्यसभेत भाजपाला बहुमत नाही. त्यामुळे राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपाची कसोटी लागेल. त्यातच उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर व्हावं, यासाठी मोदी सरकारकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटनं एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याबद्दलचं विधेयक लगेचच दुसऱ्याच दिवशी लोकसभेत येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदreservationआरक्षणcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी