शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत 

By कुणाल गवाणकर | Updated: October 20, 2020 09:10 IST

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोरील अडचणींमध्ये वाढ; मोदी सरकार लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. कोरोनामुळे अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकार तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे आणखी एका आर्थिक पॅकेजचा पर्याय उपलब्ध असल्याचं सीतारामन म्हणाल्या. सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) नेमक्या कोणत्या कारणांमुळे घट झाली, त्याचं आकलन करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे. यातून केंद्राला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्याचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष आम्ही संसदेत किंवा लोकांसमोर मांडू, असं सीतारामन म्हणाल्या.दसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरूसरकारी कंपन्यांना खर्च वाढवण्याच्या स्पष्ट सूचनासार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या सरकारी कंपन्यांना खर्च वाढवण्याच्या सूचना अर्थमंत्री सीतारामन यांनी दिल्या आहेत. 'मोठ्या कंपन्यांना २०२०-२१ मध्ये योजनाबद्ध रितीनं भांडवली खर्चाच्या ७५ टक्के हिस्स्याच्या ७५ टक्के रक्कम डिसेंबर २०२० पर्यंत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम दूर करण्यास मदत मिळेल,' असं सीतारामन यांनी सांगितलं.सणासुदीला सर्वसामान्यांना दिलासा! डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णयसीतारामन यांनी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यांच्याशी संबंधित मंत्रालयांच्या १४ कंपन्यांच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. भांडवली योजनांवर वेगानं काम करण्याच्या सूचना सीतारामन यांनी बैठकीत दिल्या. यावेळी सरकारी कंपन्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सरकारी कंपन्यांनी खर्च वाढवल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. त्यामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये भांडवली खर्च वाढवण्याचं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन