सणासुदीला सर्वसामान्यांना दिलासा! डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय

By सायली शिर्के | Published: October 14, 2020 09:02 AM2020-10-14T09:02:59+5:302020-10-14T09:16:09+5:30

Prices of Pulses : सणांच्या कालावधीत डाळी महाग होतात. पण आता सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून डाळींची आयात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

prices of pulses likely to come down soon government allows import of dal | सणासुदीला सर्वसामान्यांना दिलासा! डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय

सणासुदीला सर्वसामान्यांना दिलासा! डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी महाग झाल्याने त्याचा फटका हा लोकांना बसत आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा सणांच्या कालावधीत डाळी महाग होतात. पण आता सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून डाळींची आयात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

केंद्र सरकार जवळपास पाच लाख टन डाळींची आयात करणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटीने (DGFT)  2020-21 साठी उडीद आणि तूर डाळीची आयात कोटा यादी जारी केली आहे. सरकारने चार लाख टन तूर डाळीची आयात करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय सुमारे दीड लाख टन उडीद डाळ आयात करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत 4 लाख टन तूर डाळ आयात करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यास सांगण्यात आली आहेत. 

80 ते 90 रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता 20 ते 25 रुपयांनी महाग

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक झालेल्या पावसाचा परिणाम हा तूर पिकावर होणार आहे. यामुळे उत्पन्न दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर तूर आणि उडीद डाळ यांच्या किमती अलिकडच्या काळात सर्वाधिक वाढल्या आहेत. एक महिन्यापूर्वी 80 ते 90 रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता 20 ते 25 रुपयांनी महाग झाली आहे. रिपोर्टनुसार, सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2019 पर्यंत 18.7 लाख टन डाळीची बाहेरून खरेदी केली होती. तर 2018-2019 मध्ये 25.3 लाख टन डाळ आयात केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

डाळीचे आरोग्यदायी फायदे 

पोषक घटकांचा साठा डाळींमध्ये असतो. मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि मॅग्नेशियम असतं. डाळीत असलेल्या पोषक घटकांमुळे WHO ने डायबिटिस आणि हृदयरोगासाठी फायदेशीर मानले आहे. आजारांमध्ये डाळी खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. डाळी  या प्रोटिन्सच्या मुख्य स्त्रोत आहेत. डाळीत फायदेशीर तत्व आहेत. त्यात टॅन्सिन्स सुद्धा असतात.  डाळीत असलेले एन्टी ऑक्सीडंट्स शरीरासाठी फायदेशीर  असतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळते. डाळीत आढळणारे तंतुमय पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. 

Web Title: prices of pulses likely to come down soon government allows import of dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.