शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती, 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 11:07 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.  आज झालेल्या शपथविधीमध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. 

नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.  आज झालेल्या शपथविधीमध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली.  2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला.   शपथविधीच्या सुरुवातीला धर्मेंद्र प्रधान, पियूष गोयल, निर्मला सीतारमन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या चारही जणांनी मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता त्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. त्यानंतर शिवप्रताप शुक्ल, अश्निनीकुमार चौबे, डॉ. वीरेंद्र कुमार,  अनंत कुमार हेगडे,  राजकुमार सिंह,  हरदीपसिग पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, सत्यपाल सिंह, अल्फोन्स कन्ननथनम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यमंत्रिपदी निवड झालेल्या मंत्र्यांची थोडक्यात माहिती - राज्यमंत्रिपदी निवड झालेले  शिव प्रताप शुक्ला उत्तरप्रदेशातील राज्यसभा खासदार आहेत. ते ग्रामविकास संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत. - अश्विनी कुमार चौबे हे बिहारमधील बक्सर, लोकसभा खासदार आहेत. ते ऊर्जा आणि स्थायी समितीवर संसदीय समितीचे सदस्य आहेत.  - वीरेंद्र कुमार हे टिकमगढ, मध्य प्रदेशचे लोकसभा खासदार आहेत, त्यांनी एमए पी.एचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. - अनंतकुमार हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. ते परराष्ट्र व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत.- माजी सनदी अधिकारी आरके सिंह हे बिहारमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते.  - हरिदिप सिंग पुरी 1 9 74 च्या तुकडीचे माजी आयएफएस अधिकारी आहेत, ते ब्राझिलमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचे वडिलही मुत्सद्दी होते. -गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर लोकसभा खासदार, राजस्थान ते अर्थसंकल्प संसदीय स्थायी समितीचे सदस्य आणि फेलोशिप कमिटीचे अध्यक्ष आहेत. - सत्यपाल सिंह 1980 च्या बँचचे, महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत, ते बागपत येथून लोकसभेत गेले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अजित सिंह यांचा पराभव केला होता.-अल्फोन्स कन्ननथनम कोट्टयमचे असून प्रशासकीय सेवेत कार्यरत होते, त्यांना डिमॉलिशन मॅन नावाने ओळखले जाते.   

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकारShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी