शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

मध्यम वर्गाला मोदी सरकार मोठ्ठं गिफ्ट देणार?; अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:46 PM

नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली एनडीएनं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. मोदी सरकार 2चा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर होऊ शकतो. या अर्थसंकल्पातून सरकार मध्यमवर्गाला मोठा दिलासा देऊ शकतं. याचा फायदा नोकरदारांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षाकाठी 5 लाखांचं उत्पन्न असलेल्यांना करमाफी देण्याची घोषणा गोयल यांनी केली होती. मात्र कराच्या टप्प्यांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याचा अर्थ 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना करमुक्त करण्यात आलं. मात्र त्यापेक्षा अधिक उत्पन्न असेलल्यांना जुन्याच टप्प्यांनुसार कर भरावा लागेल. मोदींनी सत्ता राखल्यानं करांच्या टप्प्यात बदल होण्याची शक्यता आहे. गोयल यांनी मागील अर्थसंकल्प सादर करताना 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार असल्याची घोषणा केली. हा केवळ ट्रेलर असून पूर्ण अर्थसंकल्पात मध्यम आणि नवमध्यम वर्गाची काळजी घेतली जाईल, असं गोयल यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात मध्यम आणि नवमध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार प्राप्तिकराच्या टप्प्यांमध्ये बदल करू शकतं. याशिवाय प्राप्तिकर गुंतवणूक सवलत सीमा दीड लाखांनी वाढवली जाऊ शकते. प्राप्तिकर कायद्यातही आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा नोकरदारवर्गाला होईल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Budget 2019अर्थसंकल्प 2019Income Taxइन्कम टॅक्स