शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मांझींना अधिक वेळ देण्यामागे मोदींचा हात!

By admin | Updated: February 12, 2015 23:18 IST

आमदारांचा घोडेबाजार करणे शक्य व्हावे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात

नवी दिल्ली/पाटणा : आमदारांचा घोडेबाजार करणे शक्य व्हावे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा स्पष्ट आरोप जदयूचे नेते नितीशकुमार यांनी केला आहे. दरम्यान जुन्या परंपरा, घटनात्मक तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारावरच आपण मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यास सांगितले आहे, असे बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी म्हटले आहे.मांझी यांना तात्काळ बहुमत सिद्ध करा, असे न सांगता त्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावरही नितीशकुमार यांनी टीका केली. मांझींना लगेच बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. नितीशकुमार म्हणाले, ‘केंद्राने घोडेबाजार करण्याचा जो परवाना दिलेला आहे त्यावर अंमल करणे शक्य व्हावे यासाठी राजधानी दिल्लीत उच्चस्तरावरून लिहिण्यात आलेल्या पटकथेचे राज्यपाल पालन करीत आहेत.’ भाजप लोकशाहीचा गळा आवळत असल्याचा आरोप करून नितीशकुमार म्हणाले, भाजपचा पाठिंबा हवा असेल तर किमान ३५ आमदारांची जुळवाजुळव करा, असे भगव्या पक्षाने मांझी यांना सांगितलेले आहे. राज्यपालांनी आधी निर्णय घेण्यास विलंब लावला आणि नंतर मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी वेळ दिला. हे सर्व दिल्लीत लिहिण्यात आलेल्या पटकथेनुसारच केले जात असल्याचे आणि घोडेबाजाराच्या परवान्यावर अमल करण्यासाठी वेळ देण्यात आल्याचे स्पष्ट होते. मांझी यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्याची सुरुवात झाली, असे नितीशकुमार म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)