शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चकमक प्रकरणात मोदींना दिलासा

By admin | Updated: November 17, 2014 11:13 IST

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये घडलेल्या २२ चकमकींमध्ये गुजरात सरकारचा हात नसल्याचे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीच्या तपासातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये घडलेल्या २२ चकमकींमध्ये गुजरात सरकारचा हात नसल्याचे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीच्या चौकशीतून समोर आले आहे. आगामी ३ ते ४ महिन्यांमध्ये ही समिती सुप्रीम कोर्टासमोर आपला अहवाल सादर करणार असून यामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना क्लीन चिट मिळेल असे दिसते . 
गुजरातमध्ये २००२ ते २००६ या कालावधीत झालेल्या २२ चकमकींचा तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावा अशी याचिका गीतकार जावेद अख्तर आणि ज्येष्ठ पत्रकार बी जी वर्गीज यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. या चकमकी बनावट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे वारंवार केला जात होता. २०१२ मध्ये या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने चकमकप्रकरणी निवृत्त न्या. एच.एस. बेदी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने बनावट चकमकीची चौकशी केली असता यामध्ये गुजरात सरकारचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा समितीला मिळालेला नाही.समितीला २२ पैकी ३ चकमकींमध्ये  पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींना टार्गेट ठेऊन या चकमकी घडवल्याचे समितीला आढळून आलेले नाही. चकमकींमध्ये मृत्यू झालेले हे हिंदू, सिखही होते असे आढळून आले. यामध्ये केरळ, गढवाल, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधील व्यक्तींचा समावेश असून या सर्वांचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले आहे. न्या. बेदी यांनी याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 
बनावट चकमकींवरुन विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदी व त्यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. बेदी समितीने गुजरात सरकारला याप्रकरणी क्लीन चिट दिल्यास मोदींना दिलासा मिळेल.