शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अजेय भारत, अटल भाजपा; 2019 च्या निवडणुकीसाठी मोदींचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 19:07 IST

भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केले.

नवी दिल्ली - भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केले. नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट, अशी विरोधकांची अवस्था झालेली असल्याचे सांगत मोदींनी 2019 च्या निवडणुकीसाठी अजेय भारत; अटल भाजपा असा नवा नारा दिला आहे. 

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणांमधील सारांश प्रसारमाध्यमांसमोर मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीचा उल्लेख स्वार्थाने प्रेरित झालेली आघाडी असा करताना महाआघाडी म्हणजे नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट अशी असल्याचे म्हटले, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत व्हिजन 2022 सादर करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला. विरोधकांकडे नेता, निती आणि रणनिती यापैकी काहीही नसल्याची टीका त्यांनी केली. हताश झालेल्या विरोधकांकडून सध्या नकारात्मक राजकारण सुरू असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव कार्यकारणीनं एकमतानं मंजूर केला. 2022 पर्यंत 'न्यू इंडिया' साकारण्याच्या मुद्द्याचा समावेश या प्रस्तावात आहे. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक करण्यात आलं असून 'न्यू इंडिया'चा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. न्यू इंडियामध्ये ना कोणी गरीब असेल, ना कोणी बेघर असेल, असं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह