शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी अन् शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:35 IST

काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. काँग्रेस पक्षातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली असून मोदी अन् शहांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोन दिग्गज नेत्यांकडून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या खंडपीठाने देव यांच्या याचिकेवर सुनावणी करणार असल्याचे म्हटले आहे. देव यांचे ज्येष्ठ वकील, अभिषेक मनु संघवी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून मोदी आणि अमित शहांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाकडून कुठलिही कारवाई होत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, आपल्या भाषणात सैन्यातील जवानांचा वापर करत आचारसंहिता भंग झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.सुष्मिता देव यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडून मोदी आणि अमित शहांवर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले जाऊ शकतात.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मोदी आणि अमित शहांबाबत तक्रार दिला होती. त्यामध्ये, मतांचे ध्रुवीकरण करणे, प्रचारात भारतीय सैन्यदलाच्या नावाचा उल्लेख करणे आणि मतदानादिवशीही सभांचे आयोजन करणे, या बाबींचा उल्लेख करत भाजपा नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे काँग्रसने आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा