शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या आरोपात तथ्य! अय्यर यांच्या निवासस्थानी बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 11:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री उपस्थित असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्दे मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य असून 6 डिसेंबरला मणिशंकर अय्यर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अशी बैठक पार पडली.लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी  या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले, भारत-पाकिस्तान संबंधांशिवाय अन्य कुठल्याही मुद्यावर चर्चा झाली नाही असे त्यांनी एका वर्तमानपत्राकडे स्पष्ट केले.

नवी दिल्लीत - गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री उपस्थित असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने लागलीच पंतप्रधानांचा हा आरोप फेटाळून लावला होता. देशाच्या सर्वोच्चपदावर बसून पंतप्रधान मोदी निराधार आरोप करत आहेत. चिंता आणि हताशेमधून ते असे आरोप करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले होते. 

पण आता जी माहिती समोर आलीय त्यानुसार मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य असून 6 डिसेंबरला मणिशंकर अय्यर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अशी बैठक पार पडली. या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमहू कसुरी, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह तसेच पाकिस्तानातील भारतीय दूतावासात काम केलेले काही अधिकारी उपस्थित होते. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपरराष्ट्रपती हमीद अन्सारीही या कार्यक्रमाल उपस्थित होते. लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी  या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले. भारत-पाकिस्तान संबंधांशिवाय अन्य कुठल्याही मुद्यावर चर्चा झाली नाही असे त्यांनी एका वर्तमानपत्राकडे स्पष्ट केले. 23 वे लष्करप्रमुख असलेले दीपक कपूर मार्च 2010मध्ये निवृत्त झाले. काँग्रेसने अय्यर यांच्या निवासस्थानी अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचे म्हटले होते. पण अशी बैठक झाल्याचे समोर आल्याने काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. 

काय म्हणाले होते मोदीपालनपूर येथील एका सभेत बोलताना मोदींनी रविवारी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप केला. पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? ते म्हणाले की, काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानी नेत्याशी चर्चा केल्याच्या एका दिवसानंतर आपल्याला ‘नीच’ म्हटले होते.

एकीकडे पाकिस्तानी सैन्याचे माजी डीजी गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे लोक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर गुजरातमधील जनता, मागास वर्ग, गरीब लोक आणि मोदी यांचा अपमान केला जात आहे. काँग्रेसने देशाच्या जनतेला हे सांगायला हवे की, काय योजना आखली जात आहे असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017