शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

आधुनिक युगातील हा मोगलीच! कर्नाटकात चर्चेचा विषय; दोन वर्षांचा मुलगा माकडांचा ‘दोस्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 1:37 AM

दोन वर्षांच्या समर्थ बांगरी या चिमुकल्याचे आई - वडील परिसरात शेतात काम करण्यास जात असत, तेव्हा तो माकडांशी खेळत बसायचा. सुरुवातीला गावक-यांना असे वाटले की, ही माकडे मुलावर हल्ला करू शकतात..

ठळक मुद्देही माकडे आणि या मुलांची भेट आता नेहमीचीच झाली आहे. माकडांची टोळी त्याला दररोज भेटायला येते.हा मुलगा झोपी गेला असेल तर त्याला उठवून ही माकडे त्याच्याशी खेळतात आणि मगच येथून जातात. विशेष म्हणजे ही माकडे फक्त याच मुलाशी खेळतात.

धारवाड : दोन वर्षांच्या समर्थ बांगरी या चिमुकल्याला भलेही अद्याप स्पष्ट बोलता येत नसेल. पण, माकडांसोबतच्या अनोख्या मैत्रीमुळे हा चिमुकला सध्या ‘मोगली’ म्हणून ओळखला जात आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील अलापूर येथील हा मुलगा चर्चेचा विषय आहे.‘जंगल बुक’मधील मोगली तसा सर्वांच्याच परिचयाचा आहे. पण, कर्नाटकातील हा मोगली चक्क माकडांच्या टोळीमध्ये सामावूनजातो आणि त्यांच्याशी खेळताना जराही दबकत नाही.

समर्थचे काका बरमा रेड्डी यांनी सांगितले की, या मुलाचे आई - वडील परिसरात शेतात काम करण्यास जात असत, तेव्हा हा मुलगा माकडांशी खेळत बसायचा. सुरुवातीला गावक-यांना असे वाटले की, ही माकडे मुलावर हल्ला करू शकतात. मात्र, लवकरच हे स्पष्ट झाले की, ही माकडे अगदी आनंदाने या मुलाशी खेळत बसतात.

ही माकडे आणि या मुलांची भेट आता नेहमीचीच झाली आहे. माकडांची टोळी त्याला दररोज भेटायला येते. हा मुलगा झोपीगेला असेल तर त्याला उठवून ही माकडे त्याच्याशी खेळतात आणि मगच येथून जातात. विशेष म्हणजे ही माकडे फक्त याच मुलाशी खेळतात. दुस-या मुलांनी माकडांसोबत खेळण्याचा प्रयत्न केला तर, माकडे त्या मुलावर हल्ला करण्यासाठी पुढे होतात. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Karnatakकर्नाटक