शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

'एका दिवसात लाख रुपये कमवा' असे सांगत मॉडल्सना लाखो रुपयांना गंडविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 2:37 PM

मॉडल बनण्याचे स्वप्न उरी बागळणा-या मुला-मुलींना लाखों रुपयांना गंडविण्यात आल्याची घटना घडली आहे. डच फिल्मसाठी मॉडलिंग कॉन्ट्रक्ट आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली आरोपीने या मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत. 

ठळक मुद्दे'एका दिवसात लाख रुपये कमवा' असे सांगत मॉडल्सना लाखो रुपयांना गंडवले फोटोशूटच्या नावाखाली मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास मॉडल्सना आरोपीने जवळपास 5 लाख रुपयांचा गंडा घातला

नवी दिल्ली : मॉडल बनण्याचे स्वप्न उरी बागळणा-या मुला-मुलींना लाखों रुपयांना गंडविण्यात आल्याची घटना घडली आहे. डच फिल्मसाठी मॉडलिंग कॉन्ट्रक्ट आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली आरोपीने या मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत. कॉलेज फॅशन सोसायटीची सदस्य आणि दिल्ली विद्यापीठीच्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने सांगितले की, दोन आठवड्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज आला होता. यामध्ये संशयित आरोपीने सांगितले की, एक फिल्म मॉडल्सचे फोटोशूट करत आहे. तसेच, आरोपीने सांगितले की डच फॅशन कंपनीचा वरिष्ठ एजेंट आहे. तो, म्हणाला या फिल्मसाठी मुले आणि मुलींच्या मॉडल्सची गरज आहे. तीन दिवसांसाठी फोटोशूटसाठी 3 लाख रुपये देण्याचा दावा सुद्धा यावेळी त्याने केला .   एका तक्रारदाराने सांगितले की, त्याला 28 जूनला साऊथ दिल्लीतील महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. यावेळी हॉटेलच्या खोलीत आधीच सहा-सात मॉडल्स उपस्थित होत्या. एजेंट त्याच हॉटेलच्या दुस-या खोलीत राहत होता. त्याने एका दिवसासाठी फोटोशूट केले तर एक लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. तसेच, आम्हाला सांगण्यात आले होते की, पेमेंट युरो मध्ये करण्यात येईल. या चर्चेनंतर एजेंटने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बॅंकचे डिटेल्स मागितले. त्यानंतर आमच्या बॅंक खात्यातून पैसे लंपास झाल्याचे स्पष्ट झाले.     दरम्यान, याप्रकरणी पोलीस चौकशी करत असून या मॉडल्सना आरोपीने जवळपास 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समजते. अतिरिक्त डीसीपी (साऊथवेस्ट) मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली