मौदा.. लुटमार
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:05+5:302015-02-18T23:54:05+5:30
लुटमारप्रकरणी पाच जणांना अटक

मौदा.. लुटमार
ल टमारप्रकरणी पाच जणांना अटकअन्य तीन आरोपी फरार : मौद्यातील घरफोडीची घटना मौदा : चोरट्यांनी भरदिवसा घरात शिरून फिर्यादीस मारहाण करीत गंभीर जखमी केले; शिवाय घरातील २५ हजार रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. ही लुटमारीची घटना मौदा येथील लापका मार्गावर १४ फेब्रुवारीला घडली होती. तीन दिवसांच्या तपासकार्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपीसह पाच आरोपींना पकडण्यात मौदा पोलिसांना यश आले; अन्य तीन फरार आरोपींचा मौदा पोलीस शोध घेत आहेत. संदीप मनीराम यादव (२५), प्रवीण यादव शहारे (२१) बंटी ऊर्फ कमलेश ओमप्रकाश कावळे (२५) तिन्ही रा. रामटेक तर विलास महादेव लांजेवार (४०, रा. शास्त्रीनगर, नागपूर) व सराफा व्यापारी नंदू माधवराव पिंजरकर (३२, रा. हिवरी ले-आऊट, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मौदा पोलिसांनी आरोपी बंटी कावळे, संदीप वासनिक व प्रवीण शहारे यांच्याकडून अनुक्रमे १२,०००, १२,००० व १०,००० असे एकूण ३४ हजार रुपये रोख जप्त केले, तसेच एक सोनसाखळी व एक सोन्याचे ब्रेसलेट जप्त केले आहे. सदर तिन्ही आरोपींनी नागपूर येथील मित्रांच्या माध्यमाने नागपुरातील एका ज्वेलर्सला चोरीचे दागिने विकले होते. पोलिसांनी आरोपींच्या मित्रानांही ताब्यात घेतले असून, त्यांची नावे जाहीर केली नाही. घटनेतील मुख्य आरोपी बंटी ऊर्फ कमलेश कावळे हा मागील आठ दिवसांपासून फिर्यादी टंटू महादेव हटवार (७०, रा. लापका रोड, मौदा) यांच्या घरी असलेल्या सलून दुकानात बसत होता. फिर्यादीकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याची त्यास माहिती होती. याबाबत त्याने आपल्या मित्रांना माहिती दिली. रामटेक येथील तीन सराईत गुन्हेगारांना हाताशी घेत चोरट्यांनी रामटेकातील एका हॉटेलमध्ये ही लुटमार करण्याची योजना आखली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.त्यानुसार मुख्य सूत्रधार बंटी कावळे हा फिर्यादीच्या घरावर पाळत ठेवून होता. दरम्यान, शनिवारी चोरट्यांनी भरदिवसा फिर्यादी टंटू हटवार यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण करीत २५ हजार रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने पळविले.