केवळ ३५० रुपयांत मिळताहेत मोबाईल, पाहा कुठे सुरू आहे ही खास ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 16:56 IST2022-12-26T16:55:55+5:302022-12-26T16:56:23+5:30
Mobiles : तुम्हाला जर एकाचवेळी अनेक फिचर्स असलेला फोन खरेदी करायचा असेल आणि तुमचं बजेट खूप कमी असेल तर एक मार्केट आहे जिथे तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये फोन खरेदी करू शकता

केवळ ३५० रुपयांत मिळताहेत मोबाईल, पाहा कुठे सुरू आहे ही खास ऑफर
जर तुम्ही मार्केटमध्ये एखादा किमान चांगला फिचर फोन खरेदी करण्यासाठी गेलात तर तु्म्हाला त्यासाठी किमान एक हजार रुपये किंवा १५०० रुपये मोजावे लागतात. कारण फोन खरेदी करण्यासाठी लागणारी ही किमान रक्कम आहे. जर तुम्हाला फोनमध्ये काही फिचर हवे असतील तर जास्तीच्या किमतीचे फोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ते तुम्ही दोन हजार रुपयांपासून अडीच हजार रुपये खर्चून खरेदी करू शकता. मात्र तुम्हाला जर एकाचवेळी अनेक फिचर्स असलेला फोन खरेदी करायचा असेल आणि तुमचं बजेट खूप कमी असेल तर एक मार्केट आहे जिथे तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये फोन खरेदी करू शकता. सॅमसंगचे हे फिचर फोन या मार्केटमध्ये विकले जात आहेत जिथे त्यांची किंमत एवढी कमी आहे की त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
फेसबूकच्या मार्केटप्लेसवर एक सेलर सॅमसंगच्या स्वस्त फिचर फोनची विक्री करत आहे. या फिचर फोन्सची किंमत केवळ ३५० रुपये एवढी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे इथे सर्व फिचर फोन केवळ ३५० रुपयांना मिळत आहेत. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार नाहीत. केवळ तु्म्हाला फेसबूक मार्केटप्लेसवर जाऊन तुमचा फोन निवडावा लागेल, त्यानंतर तुम्ही हा फोन घरी मागवू शकता.
मात्र जर तुम्ही मोठ्या संख्यने फिचर फोन मागवत असाल तर मात्र काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे फोन मागवताना आधी पेमेंट करण्याची चूक करू नका. कारण अनेक विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात आणि ग्राहकाकडून प्रॉडक्ट पाठवण्यापूर्वीच पूर्ण पैसे घेतात. मात्र त्यांना प्रॉडक्ट पाठवत नाहीत. त्यामुळे असे प्रॉडक्ट खरेदी करतान थोडी काळजी घ्या.