काश्मीरात किश्तवाड क्षेत्रातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:28 IST2026-01-31T06:28:42+5:302026-01-31T06:28:54+5:30

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा कारवाईदरम्यान दशतवाद्यांना कोणताही गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या क्षेत्रातील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केली आहे.  

Mobile, internet services suspended in Kishtwar area of Kashmir | काश्मीरात किश्तवाड क्षेत्रातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद

काश्मीरात किश्तवाड क्षेत्रातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा कारवाईदरम्यान दशतवाद्यांना कोणताही गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या क्षेत्रातील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केली आहे.  

सुरक्षा दलाने शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सिंहपोरा, चिंगम व चतर या भागातील सहा किमी क्षेत्रात मोबाइल व इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने १८ जानेवारी रोजी या क्षेत्रात मोहीम सुरू केली होती. त्यावेळी मंड्राल-सिंहपोराजवळील सोनार जंगलात दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर ७ जवान जखमी झाले होते. त्यानंतर २२ जानेवारीला माली डाना टॉप व २५ जानेवारी रोजी जनसीर-कांडीवार भागात पुन्हा दहशतवाद्यांशी  चकमकी उडाल्या त्यावेळी दहशतवादी जंगलात पसार झाले होते. 

Web Title : कश्मीर के किश्तवाड़ में खोज के बीच मोबाइल, इंटरनेट सेवाएं निलंबित

Web Summary : कश्मीर के किश्तवाड़ में सुरक्षा बलों ने जैश-ए-मोहम्मद के आतंकवादियों की तलाश शुरू की। अभियान के दौरान एहतियाती उपाय के रूप में क्षेत्र में मोबाइल और इंटरनेट सेवाएं निलंबित कर दी गईं। पिछली मुठभेड़ों में हताहत हुए, जिससे क्षेत्र में खोज प्रयासों को जारी रखने के लिए प्रेरित किया गया।

Web Title : Mobile, Internet Services Suspended in Kashmir's Kishtwar Amid Search

Web Summary : Security forces in Kashmir's Kishtwar launched a search for Jaish-e-Mohammed terrorists. Mobile and internet services were suspended in the area as a precautionary measure during the operation. Previous encounters resulted in casualties, prompting continued search efforts in the region.