आमदार विधानसभेत पान मसाला खाऊन थुंकले, सभापतींनी संपात व्यक्त केला; म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:01 IST2025-03-04T13:46:53+5:302025-03-04T14:01:31+5:30

उत्तर प्रदेशमध्ये एका आमदाराने सभागृहातच पान मसाला खाऊन थुंकल्याची बातमी समोर आली.

MLA spits after eating pan masala in the Assembly, Speaker expresses his protest | आमदार विधानसभेत पान मसाला खाऊन थुंकले, सभापतींनी संपात व्यक्त केला; म्हणाले,...

आमदार विधानसभेत पान मसाला खाऊन थुंकले, सभापतींनी संपात व्यक्त केला; म्हणाले,...

उत्तर प्रदेश विधानसभेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सभागृहात एका आमदाराने पान मसाला खाऊन थुंकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता विधानसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त केला आहे. 

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, एका आमदाराने पान मसाला खाल्ला आणि सभागृहात थुंकले. विधानसभा अध्यक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते अनुशासनहीन असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की 'मी व्हिडिओमध्ये हे कोणी केले ते पाहिले आहे, परंतु मी कोणत्याही सदस्याचे नाव घेणार नाही', असंही अध्यक्ष म्हणाले.

PM Modi Vantara Video: मायेची फुंकर! कुशीत घेतलं, दूध पाजलं, भरवलं... पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'प्राणीप्रेम'

आज कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनीही या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. विधानसभेच्या अध्यक्षांनी  गंभीर स्वरात सांगितले की, असे वर्तन सभागृहात अजिबात स्वीकारार्ह नाही. 'आज सकाळी मला कळले की आमच्या सभागृहातील एका सन्माननीय सदस्याने पान मसाला खाल्ला आणि तिथे थुंकले.' मी येऊन ते स्वच्छ केले. हे कोणी केले याचा व्हिडीओ मी पाहिला आहे, पण मला कोणाचाही अपमान करायचा नाही.'

विधानसभा अध्यक्ष सतीश महाना पुढे म्हणाले की, विधानसभा ही कोणत्याही एका व्यक्तीची नाही तर ४०३ आमदारांची आणि उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेची आहे. ते स्वच्छ आणि प्रतिष्ठित ठेवणे ही सर्व सदस्यांची जबाबदारी आहे.

'ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांची ओळख पटली आहे.' जर ते स्वतः पुढे येऊन त्यांची चूक मान्य करेल तर ठीक आहे, नाहीतर मला त्यांना बोलावावे लागेल. सभापतींनी सदस्यांना आवाहन केले आणि सांगितले की, जर कोणत्याही आमदाराने त्यांच्या सहकाऱ्याला असे कृत्य करताना पाहिले तर त्यांनी त्यांना त्वरित असे करण्यापासून रोखावे. "हे सभागृह आपल्या प्रतिष्ठेचे आणि उत्तर प्रदेशातील लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. ते स्वच्छ आणि आदरणीय ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले. 

Web Title: MLA spits after eating pan masala in the Assembly, Speaker expresses his protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.