शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

मिझोराम : आपणच भाजपाविरोधी दाखविण्याचे जोरात प्रयत्न; सत्ताधारी व विरोधक दोघांत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 5:36 AM

ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या मोहिमेत हे राज्य ठरू शकते मोदींसाठी अडथळा

ऐझॉल : केवळ १० लाख लोकवस्ती असलेल्या मिझोराम या पर्वतीय राज्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी २८ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) यांच्यामध्ये सर्वात कडवा भाजपाविरोधक कोण हे दाखविण्याची चुरस लागली आहे. मात्र गमतीचा भाग असा की या दोन्ही पक्षांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भाजपाशी याआधी हातमिळवणी केली होती.ख्रिश्चनबहुल मिझोराममध्ये ३0 वर्षांत भाजपला विधानसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही तरीही केंद्रात सत्ताधारी पक्षाला या निवडणुकांत महत्त्व आले आहे. काँग्रेस व एमएनफने राज्यात आजवर आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे. भाजपाचा घटक पक्ष असल्याचे आरोप हे पक्ष एकमेकांवर करत आहेत. त्यासाठी भाजपाशी पूर्वी हातमिळवणी केल्याची जुनी छायाचित्रे, सभांतील भाषणे यांचे संदर्भ मतदारांसमोर आणली जात आहे.

एमएनएफ हा एनडीएचा घटक पक्ष होता. या पक्षाने भाजपाशी छुपी हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून तो दावा सिद्ध करण्यासाठी ५० हजार पत्रके छापून ती मतदारांना वाटली आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा व एमएनएफचे नेते झोरामथंगा यांचे एकत्रित छायाचित्रही त्या पत्रकावर आहे, तर चकमा स्वायत्त जिल्हा कौन्सिलच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस व भाजपाने हातमिळवणी केल्याचा आरोप एमएनएफने केला. आता ही युती राहिलेली नाही, असे काँग्रेसने जाहीर केले आहे. भाजपाला ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्यात मिझोरम हा मोठा अडथळा आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे, तर नागालँड, मेघालयमध्ये भाजपाने आघाडी सरकार स्थापन केले आहे.

मिझोरम राज्यातील ११६४ मतदान केंद्रापैकी ३८ केंद्रे अतिसंवेदनशील तर ३० केंद्रे संवेदनशील आहेत. या भागांत केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात २८ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणूक अधिकाºयाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष आणि शांततेत निवडणूक घेणे हे आयोगासमोर दिव्य आहे. ब्रू समाजाचा मुद्दा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला असून तो जास्त स्फोट बनू नये यासाठी प्रशासन सक्रीय आहे.७६ टक्के बंदुका जमाविधानसभा निवडणुकांमुळे ७६ टक्के म्हणजे १० हजार ३३७ परवानाधारकांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. पोलीस महासंचालक एल. एच. शानलिआना म्हणाले की, या शस्त्रधारकांमध्ये शेतकरीही मोठ्या प्रमाणावर आहेत. पिकांचे प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने दिले जातात. मिझोरम निवडणुकांत आसाम, त्रिपुरा, मणिपूरमधील लोकांनी येऊन गडबड करू नये म्हणूनही पोलीस दक्षता घेत आहेत. 

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाElectionनिवडणूक