सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 20:18 IST2024-10-09T20:17:43+5:302024-10-09T20:18:24+5:30
Gujarat Crime News: गुजरातमधील सूरतमध्ये नवरात्रौत्सवादरम्यान एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
गुजरातमधील सूरतमध्ये नवरात्रौत्सवादरम्यान एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी एका मित्रासोबत बाहेर गेली होती. आता पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम ७०-बी, ११५-बी, ५४, ३०९-४ आणि पॉक्सो कायद्याशी संबंधिक कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक हितेश जॉयसर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोसांबा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील मंगरोल तालुक्यातील एका गावाच्या बाहेरील भागात निर्जन ठिकाणी एका १७ वर्षय मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलं. सदर मुलगी क्लास संपल्यानंतर तिच्या मित्रांना भेटण्यासाठी गेली होती. मंगळवारी रात्री सुमारे १०.३० वाजता तिने मित्रांसोबत आईसक्रिम खाल्ली. त्यानंतर ती आपल्या एका मित्रासोबत बोरसारा गावाजवळ असलेल्या हायवेवर पेट्रोल पंपाजवळच्या निर्जन रस्त्यावर बसली. त्याचवेळी तीन लोक तिथे आले. त्यांनी या तरुणीला पकडले. तर तिच्यासोबत असलेला मित्र तिला तिथेच सोडून पळून गेला.
त्यानंतर तिन्ही आरोपींनी या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच तिचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर पीडितेच्या मित्राने घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकणात एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच दोन आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे.