शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

काय सांगता? मृत्यूनंतर 19 तासांनी मुलगा पुन्हा श्वास घेऊ लागला अन् चमत्कार झाला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 09:23 IST

Boy starts breathing after 19 hours of death : मृत्यूनंतर 19 तासांनी मुलाच्या शरीरामध्ये पुन्हा काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली आहे. तीन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी दुपारी 3 वाजता एका अल्पवयीन मुलाला मृत घोषित केलं. मात्र मृत्यूनंतर 19 तासांनी पुन्हा मुलगा श्वास घेऊ लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मंगळवारी सकाळी 10 वाजता त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या घरी पोहोचले. तर मृत्यूनंतर 19 तासांनी त्याच्या शरीरामध्ये पुन्हा काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मुलावर 4 तास उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच या मुलाचा मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगली होती. मानधाताच्या डिहवा गावातील 17 वर्षीय कमलेश मौर्य याची तब्येत खराब झाली होती. याच कारणामुळे तीन दिवसाआधी कुटुंबीय त्याला प्रयागराज येथे घेऊन गेले आणि त्याला एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी दुपारी डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केलं. रुग्णालयाचं बिल भरायला उशीर झाल्यामुळे रात्री हे सर्व तिथेच थांबले. मंगळवारी सकाळी 10 वाजता कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले तेव्हा त्याला मिठी मारू लागले.

कमलेशच्या शरीरात याच दरम्यान अचानक काही हालचाली जाणवू लागल्या. हे पाहून कुटुंबीयदेखील हैराण झाले. तात्काळ त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याची नाडी तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीया तात्काळ कमलेशला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे भरती केल्यानंतर त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. चार तास कमलेश श्वास घेत होता मात्र दुपारी दोनच्या सुमारास त्याचा श्वास थांबला. यानंतर कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी परतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं, आत्महत्या करून जीवन संपवलं 

 बिहारमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. पुलावरून कालव्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतास जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांना जेव्हा या भयंकर घटनेची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी कालव्यामध्ये मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. तब्बल 12 तासांनंतर अनेक समस्यांचा सामना केल्यावर सोमवारी सकाळी डलमियानगर परिसराजवळीन कालव्यामध्ये मृतदेह सापडला. तरुणाच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर