शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

Vijay Kashyap : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 23:46 IST

Vijay Kashyap : विजय कश्यप योगी सरकारमध्ये पूर आणि नियंत्रण राज्यमंत्री होते. 29 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

ठळक मुद्देविजय कश्यप हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभेचे आमदार होते.

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली. तब्येत बिघडल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय कश्यप हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभेचे आमदार होते. (UP minister Vijay Kashyap die due to Corona)

विजय कश्यप योगी सरकारमध्ये पूर आणि नियंत्रण राज्यमंत्री होते. 29 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि जवळच्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.

याआधी मंगळवारीच उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांचे बंधू जितेंद्र बालियान यांचेही कोरोनामुळे निधन झाले.  जितेंद्र बालियान हे पंचायत निवडणुकीत कुटबी गावचे सरपंच बनले होते. केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांच्या कुटुंबीयांना पंचायत निवडणुकीनंतर कोरोनाचा संसर्ग झाला होता.

जितेंद्र बालियन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सध्या त्यांच्या दुसर्‍या भावाची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावरही एम्समध्येही उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेयगेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात कोरोनाचे 8737 नवे रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात सध्या 136342 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सतत घट होत असल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMLAआमदार