मेट्रो ३ चे किमान भाडे ११ रुपये!

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:26+5:302015-02-14T23:50:26+5:30

मेट्रो ३ चे किमान भाडे ११ रुपये!

Minimum rental of Metro 3 is 11 rupees! | मेट्रो ३ चे किमान भाडे ११ रुपये!

मेट्रो ३ चे किमान भाडे ११ रुपये!

ट्रो ३ चे किमान भाडे ११ रुपये!
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ चे किमान भाडे ११ रुपये तर कमाल भाडे ३६ रुपये असणार आहे. परिणामी मेट्रो वनच्या तुलनेत मेट्रो ३ प्रवाशांना भविष्यात का होईना दिलासादायक ठरणार आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणार्‍या मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० रुपये आहे. दिल्ली आणि बंगळूरु मेट्रोच्या तुलनेत मुंबई मेट्रोचे भाडे अधिक आहे. आणि मुंबई मेट्रोचे दर प्रवाशांना दिलासा देणारे असावेत; म्हणून राज्य सरकारने सध्या तरी उल्लेखनीय पाऊले उचलेली नाहीत. मेट्रो कायद्यानुसार दर निश्चिती समिती ही मेट्रोचे दर ठरविते. आणि मेट्रो ३ हा प्रकल्प स्वत: राज्य सरकार म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच राबविणार आहे. परिणामी मेट्रो ३ चे दर माफक ठेवण्यावर सरकारचा भर आहे.
मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ साली सुरु होणार असून, २०२० साली हे काम पुर्ण होणार आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा भुयारी मेट्रो धावू लागेल तेव्हा त्यातून २०२० साली म्हणजे दिवसागणिक १४ लाख प्रवासी प्रवास करतील. शिवाय २०३० साली भुयारी मेट्रोतून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या १७ लाखांवर पोहचेल. शिवाय रस्त्यांवरील ३५ टक्के वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे. (प्रतिनिधी)
...................
मेट्रो ३ चे प्रस्तावित तिकिट दर
किमी रुपये
०-३ ११
३-८ १३
८-१२ १६
१२-१५२०
१५-२०२४
२०-२५२७
२५-३०३०
३०-३५३६
...................
कुलाबा-सीप्झ मेट्रोमध्ये २७ स्थानके असतील. त्यापैकी २६ स्थानके भुयारी असतील.
आरे कॉलनी स्थानक जमिनीवर असेल. भुयारी स्थानके १५ ते २५ मीटर खोल असतील.
बांधकाम सात भागांत विभागले जाईल आणि १४ विविध ठिकाणी बांधकामाची सुरुवात होईल.
भुयारी मेट्रोसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
बोगद्याच्या भागासाठी टनेल बोरिंग मशिन वापरले जाईल.
बांधकामासाठी कट ॲण्ड कव्हर पद्धत किंवा न्यू ऑस्ट्रीयन टनेल पद्धत वापरली जाईल.
...................
स्थानके - कफपरेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँन्टरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी मेट्रो, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर मेट्रो, शितला देवी मंदिर, धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी विमानतळ (राष्ट्रीय), सहार रोड, छत्रपती शिवाजी विमानतळ (आंतरराष्ट्रीय), मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे कॉलनी.
...................

Web Title: Minimum rental of Metro 3 is 11 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.