५० गावांना मिळणार मिनरल वॉटर जोड

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30

जिल्‘ात पाच गावांत ही योजना कार्यान्वित झाली असून लवकरच ५० गावांत वॉटर प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत. इच्छुक असणार्‍या गावांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यात ५० गावांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Mineral water connections will be available to 50 villages | ५० गावांना मिळणार मिनरल वॉटर जोड

५० गावांना मिळणार मिनरल वॉटर जोड

ल्ह्यात पाच गावांत ही योजना कार्यान्वित झाली असून लवकरच ५० गावांत वॉटर प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत. इच्छुक असणार्‍या गावांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यात ५० गावांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
...............
जिल्ह्यात सध्या नऊ गावांत जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. यात दरेवाडी आणि शिवाजीनगर, निंबळक (नगर), मांदळी (कर्जत), चंद्रापूर (राहाता), जमीदारवाडी (जामखेड), रायतेवाडी, साकूर (संगमनेर)आणि दिघी (कर्जत) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पुढील वर्षभरात किमान १५० गावांना वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत.
................
शुध्द आणि मोजून पाणी देण्यासोबत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दोन गावांमध्ये सातही दिवस २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठी लवकर गावे निश्चित करण्यात येणार आहेत. ज्या गावात प्रत्येक नळ जोडला जलमापक यंत्रण असेल, त्या ठिकाणी हा प्रयोग शक्य होणार आहे.
..............

Web Title: Mineral water connections will be available to 50 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.