MIM Owaisi on Inflation : महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:43 IST2022-07-05T14:42:52+5:302022-07-05T14:43:37+5:30
MIM Owaisi on Inflation : जरी डिझेल १०० रूपयांच्या वर आहे, तरी यासाठी पंतप्रधान मोदी नाही, औरंगजेब जबाबदार आहे असं म्हणत ओवेसींनी साधला निशाणा.

MIM Owaisi on Inflation : महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा
MIM Owaisi on Inflation : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महागाई, बेरोजगारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही, तर मुघल जबाबदार आहेत, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
यापूर्वीही अनेकदा अनेक मुद्द्यांवरून ओवेसी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. दरम्यान, एमआयएमनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ओवेंसींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका सभेला संबोधित करताना दिसत आहेत. “भारतातील तरूण बेरोजगार आहेत. महागाई गगनाला भिडत आह. डिझेल १०० रूपयांच्या पार गेलं आहे. पण नक्कीच यासाठी मोदी नाही, औरंगजेब जबाबदार आहे,” असं म्हणत ओवेसींनी निशाणा साधला.
“आज मुलांकडे नोकरी नाही, यासाठी अकबर जबाबदार आहे. पेट्रोल १०४ रूपये झालं आहे. त्यासाठी ताजमहाल तयार करणारा जबाबदार आहे. जर ताजमहाल बनला नसता तर आज पेट्रोल ४० रूपयांमध्ये मिळालं असतं. ताजमहाल, लालकिल्ला उभारून मुघलांनी चूक केली असं वाटतं. ते पैसे त्यांनी वाचवून ठेवायला हवे होते,” असंही ते पुढे म्हणाले.
देश में महंगाई, बेरोज़गारी, और बढ़ती पेट्रोल-डीज़ल की कीमतों का ज़िम्मेदार @narendramodi नहीं, मुग़ल हैं😜 - Barrister @asadowaisihttps://t.co/KLDrUaOwMz
— AIMIM (@aimim_national) July 4, 2022
केवळ मुघलच दिसतात - ओवेसी
"भारतात केवळ मुघलांचंच राज्य होतं का?, असा सवाल ओवेसी यांनी यावेळी केला. त्यांच्यापूर्वी सम्राट अशोक, चंद्रगुप्त यांचंही राज्य होतं. परंतु भाजपला एकीकडे मुघल आणि दुसरीकडे पाकिस्तान दिसतो. ना आम्हाला मुघलांशी काही घेणंदेणं आहे, ना पाकिस्तानशी काही संबंध. जिन्नांबद्दल आम्हाला काय करायचंय?, त्यांचा निर्णय आम्ही नाकारला होता," असंही ते म्हणाले.