शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

गोडसेबद्दल तुमचं मत काय?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

By जयदीप दाभोळकर | Published: January 02, 2021 10:47 AM

मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर ओवेसींनी साधला निशाणा

ठळक मुद्देओवेसींनी ट्विटरद्वारे केले सवालगांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? याचं उत्तर मोहन भागवत देतील का? ओवेसींचा सवाल

"माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढंच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल असं महात्मा गांधी म्हणाले होते," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी केलं होतं. ते 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. तसंच गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? असा सवालही केला आहे.

"गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? याचं उत्तर मोहन भागवत देतील का? नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाबाबत, तसंच १९८४ मधील शीख विरोध आणि २०२० मधील घटनेबद्दल काय विचार आहेत?," असे सवाल ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारले.

"धर्म कोणताही असला तरी बहुतांश भारतीय देशभक्त आहेत हे मानणं तर्कसंगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतच एका धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीचं प्रमाणपत्र दिलं जातं. तर इतरांचं जीवन आपण या ठिकाणी अस्तित्वात आहोत हे सिद्ध करण्यात आणि आपण भारतीय आहोत हे सांगण्यातच निघून जातं," असंही ओवेसी म्हणाले. 

काय म्हणाले होते भागवत ?"पूजा पद्धती, कर्मकांड कुठलेही असोत, मात्र, सर्वांनी एकत्रितपणे रहायला हवं. फरक म्हणजे फाटाफूट नव्हे (difference doesn't mean separatism). जोवर मनात ही भीती असेल, की तुमच्या असल्याने माझ्या अस्तित्वाला धोका आहे आणि आपल्याला माझ्या असल्याने आपल्या अस्तित्वाचा धोका वाटेल, तोवर सौदे तर होऊ शकतात, पण आत्मीयता निर्माण होऊ शकत नाही," असं भागवत म्हणाले होते. 

"वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे प्रकाशन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे आणि ज्यांचे मत यापेक्षा वेगळे असेल, तेदेखील संशोधन करून लिहू शकतात," असंही भागवत म्हणाले होते.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसे