शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन गेमिंग’ची कोट्यवधींची करचोरी? सात कंपन्यांना नोटिसा जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:55 IST

आयकर आणि जीएसटी अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यंत्रणा ऑनलाइन गेमिंगमधील कर चुकवेगिरीसंदर्भात सक्रिय झाल्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी २८ हजार काेटींचा कर बुडविल्याचा आयकर विभागाला संशय असून, त्या अनुषंगाने सात प्रमुख ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना आयकर विभागाने नोटिसा जारी केल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागानेदेखील या कंपन्यांना नोटिसा जारी करीत तब्बल अडीच लाख कोटी रुपयांची वसुली करण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे समजते.

आयकर आणि जीएसटी अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यंत्रणा ऑनलाइन गेमिंगमधील कर चुकवेगिरीसंदर्भात सक्रिय झाल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये ऑनलाईन गेम खेळणाऱ्या खेळाडूंना ५८ हजार कोटी रुपयांची बक्षिसे प्राप्त झालेली आहे. यापैकी ३० टक्के लोकांना २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे मिळालेली आहेत. संबंधितांनी या पैशांचा स्रोत त्यांच्या विवरणामध्ये नमूद केला नाही, तसेच त्यावर आकारणी होणारा करही भरलेला नाही. १० हजार रुपयांवर जो ग्राहक बक्षीस जिंकतो त्याला त्याच्या पैशांचे वितरण करताना ०.१ टक्का कर कंपन्यांनीच कापून उरलेली रक्कम हातात देणे अपेक्षित आहे. मात्र, यामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे दिसून आल्यानंतर आता आयकर विभागाने तपासाच्या पहिल्या टप्प्यांत सात कंपन्यांना नोटिसा जारी केल्या आहेत.

दुसरीकडे, केंद्रीय वस्तू व सेवा कर या अप्रत्यक्ष कर प्रणालीनेदेखील ऑनलाइन गेमिंग कंपन्यांची चौकशी करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे समजते. जुलै २०२२ मध्ये ऑनलाइन गेमिंगवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून २८ टक्के इतका वाढविण्यात आला आहे. देशात आजच्या घडीला ऑनलाइन गेमिंग क्षेत्रामध्ये ४०० कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर जीएसटी थकल्याची माहिती असून, या कंपन्यांना नोटिसा जारी करण्याचे काम सुरू झाले असून, या कंपन्यांच्या माध्यमातून अडीच लाख कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.  

ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्राची नियमावली लवकरच ऑनलाईन गेमिंगसाठी सध्या कोणतीही नियमावली नाही. मात्र, या खेळातील कमाईची आर्थिक व्याप्ती पाहता आणि यातून गैरप्रकार वाढीस लागण्याची शक्यता गृहीत धरता, या प्रकारासाठी नियमावली करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असल्याचे समजते.  विशेष म्हणजे, याकरिता एक विशेष नियमन संस्था स्थापन करण्याचा देखील विचार सुरू असल्याची माहिती आहे. जर एखाद्या ऑनलाईन गेमिंग कंपनीने काही गैरप्रकार केला तर या नियमन संस्थेच्या माध्यमातून त्या कंपनीवर बंदी घातली जाईल. 

२८००० काेटींचा कर चुकविला?या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची केवायसी कागदपत्रे घेणे देखील या कंपन्यांवर बंधनकारक करण्यात येणार आहे.

ऑनलाइन बेटिंगचा प्रचार टाळाटीव्ही आणि डिजिटल मीडियाने यापुढे ऑनलाईन गेमिंग आणि त्यातही विशेषतः बेटिंग गेम्स करणाऱ्या कंपन्यांची जाहिरात करणे टाळावे, असे निर्देश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केले आहेत. 

टॅग्स :Taxकर