करोडपती भिकारी! आठवड्याला कमावतात ७५ हजार; महिन्याला होतेय लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:44 IST2024-12-13T13:43:39+5:302024-12-13T13:44:08+5:30

भिकाऱ्यांची संपत्ती आणि कमाई ऐकून तुम्हाला मोठा धक्काच बसेल. हे भिकारी तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावत आहेत.

millionaire beggar in mp income is so many lakhs in year | करोडपती भिकारी! आठवड्याला कमावतात ७५ हजार; महिन्याला होतेय लाखोंची कमाई

करोडपती भिकारी! आठवड्याला कमावतात ७५ हजार; महिन्याला होतेय लाखोंची कमाई

अनेकदा आपण रस्त्यावर, चौकाचौकात, ट्रेन आणि बसमध्ये भिकाऱ्यांना गरीब, बिचारे आणि निराधार समजतो आणि त्यांना पैसे देतो, पण या भिकाऱ्यांची संपत्ती आणि कमाई ऐकून तुम्हाला मोठा धक्काच बसेल. हे भिकारी तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावत आहेत. त्यामुळे भीक मागून करोडपती झालेले अनेक भिकारी आहेत. 

मध्य प्रदेशातील इंदूरमधून पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिला भिकाऱ्याने एका आठवड्यात तब्बल ७५ हजार रुपये कमावले आहेत. हे काही पहिलं प्रकरण नाही. तर याआधीही इंदूर, भोपाळ, लखनौ आणि मुंबईच्या रस्त्यांवर भिकारी भीक मागून करोडपती झाल्याच्या अनेक घटना या समोर आलेल्या आहेत.

इंदूरला भिकारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान महिला व बालविकास विभागाच्या पथकाने इंदूरमधील १४ वेगवेगळ्या ठिकाणांहून भिकाऱ्यांना पकडलं. यावेळी एका महिला भिकाऱ्याचं आठवड्याचं उत्पन्न समजल्यावर महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही अचंबित झाले. महिला भिकाऱ्याकडे ७५ हजार रुपये सापडले, ही फक्त एका आठवड्याची कमाई होती.

राजवाडाजवळील शनी मंदिरात अधिकाऱ्यांना एक महिला भीक मागताना दिसली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना महिलेच्या साडीतून ७५ हजार रुपये सापडले. महिला भिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ही कमाई एका आठवड्यासाठी असते. ऑक्टोबरमध्ये इंदूर पोलिसांनी २२ भिकाऱ्यांच्या एका गटाला पकडलं होतं, जे दिवसभर रस्त्यावर भीक मागायचे आणि रात्री हॉटेलमध्ये जाऊन आराम करायचे. ही टोळी राजस्थानातून इंदूरमध्ये आली होती.

यापूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलिसांनी इंदूरमधून भीक मागणाऱ्या महिलेला अटक केली होती. महिलेने आपली संपत्ती सांगितली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. इंद्रा नावाच्या या महिलेचं दोन मजली घर आणि जमीन होती. याशिवाय ती २० हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन वापरायची. तिच्या घरी मोटारसायकलही होती. एवढंच नाही तर चौकशीत महिलेने ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावल्याचं सांगितलं.

Web Title: millionaire beggar in mp income is so many lakhs in year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.