तळवळकर जिमकडून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:37+5:302016-01-30T00:17:37+5:30

नाशिक : गंगापूररोडवरील तळवळकर फिटनेस सोल्यूशनच्या संचालकांनी मासिक व वार्षिक विविध आकर्षक योजनांद्वारे नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पोलीससूत्रांनी दिली आहे़ या जिमच्या ३४ ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास पुढाकार घेतला असून जिमचे संचालक राहुल तळवळकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़

Millennium fraud of citizens in talwalkar gym | तळवळकर जिमकडून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

तळवळकर जिमकडून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

शिक : गंगापूररोडवरील तळवळकर फिटनेस सोल्यूशनच्या संचालकांनी मासिक व वार्षिक विविध आकर्षक योजनांद्वारे नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पोलीससूत्रांनी दिली आहे़ या जिमच्या ३४ ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास पुढाकार घेतला असून जिमचे संचालक राहुल तळवळकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
जेहान सर्कल येथील तळवळकर फिटनेस या जिमचे संचालक राहुल भास्कर तळवळकर, अंबर तळवळकर व जिम व्यवस्थापक यांनी फसवणूक केल्याची फिर्याद अशोक सिंग यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ नाशिकमध्ये या जिमचे सुमारे ११०० सदस्य असून त्यापैकी ४०० सदस्यांनी २५ हजार रुपये तर ७०० सभासदांनी वर्षभराचे पैसे जमा गेले आहेत़ अशा प्रकारे ही फसवणूक कोट्यवधी रुपयांच्या घरात पोचली आहे़
तळवळकर गु्रपने अचानक ही जिम बंद करून तसेच परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून रक्कम घेऊन पोबारा केला होता़ यामध्ये पोलिसांनी राहुल तळवळकरला अटक केली असली तरी अंबर तळवळकर व जिमचा व्यवस्थापक फरार आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Millennium fraud of citizens in talwalkar gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.