शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 19:19 IST

कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते.  त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

ठळक मुद्देमिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नका. देशाच्या महान खेळाडूला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा, असे ट्विट रिजिजू यांनी केलंय.

नवी दिल्ली - भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिली. तसेच, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.   

कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते.  त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी अचानक पुन्हा मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली. गुरूवारी दुपारी ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाल्यानं त्यांना चंडिगढ येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा आणि पोस्ट येऊ लागल्या. त्यामुळे, देशाच्या क्रीडामंत्र्यांनीच ट्विट करुन मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नका. देशाच्या महान खेळाडूला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा, असे ट्विट रिजिजू यांनी केलंय.  

कोरोनाची लागण झाली होती

गेल्या आठवड्यात सोमवारी मिल्खा सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे समोर आले आणि त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मिल्खा सिंग यांचा मुलगा व गोल्फपटू जीव शनिवारी दुबईहून चंडिगढ येथे दाखल झाला. त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंग या अमेरिकेत डॉक्टर आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्याही भारतात दाखल झाल्या आहेत. 

टॅग्स :Milkha Singhमिल्खा सिंगcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया