अभिमानास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली ISS, देशात मिळवली 12 वी रँक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:48 IST2021-08-04T18:46:53+5:302021-08-04T18:48:04+5:30
iss : कल्पनाच्या या यशानंतर आझाद नगर परिसरातील तिच्या घरी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. कल्पनाची आई राजबाला या सुद्धा खूप आनंदी आहेत.

अभिमानास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली ISS, देशात मिळवली 12 वी रँक
हिसार : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत हरयाणाच्या हिसारमधील मुलीने देशात 12 वी रँक मिळवली आहे. कल्पना असे या मुलीचे नाव असून तिने कोणत्याही कोचिंगशिवाय या परीक्षेत यश मिळवले आहे. या यशाबद्दल कल्पनाचे अभिनंदन करण्यासाठी तिची घरी लोकांची गर्दी होत आहे. (milk seller women daughter got 12th rank in all india iss upsc result 2021)
कल्पनाच्या या यशानंतर आझाद नगर परिसरातील तिच्या घरी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. कल्पनाची आई राजबाला या सुद्धा खूप आनंदी आहेत. मुलीने केवळ कुटुंबाचेच नाव नाही तर 12 वी रँक मिळवून संपूर्ण राज्याचे नाव उंचावले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, मुलगी लहानपणापासूनच खूप हुशार होती. आज तिच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे, जे या परीक्षेत उत्तीर्ण झाले, असे त्यांनी सांगितले.
भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षेसाठी कल्पनाने तयारी केली आणि कोणत्याही कोंचिगशिवाय ही परीक्षा पास झाली, असे राजबाला म्हणाल्या. तर कल्पनाने सांगितले की, कोचिंगशिवाय हे थोडे कठीण होते, परंतु मेहनतीत कोणतीही कसर सोडली नाही. कोचिंगशिवाय प्रामाणिकपणे परीक्षा दिली.
कल्पना तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना आणि शिक्षकांना देते. कल्पनाची आई राजबाला गावातच दूध डेअरी चालवते. राजबाला स्वतः हिसारला दूध घेऊन जातात आणि विकतात. कल्पनाचे वडील पटवारी असून ते सध्या सिवानीमध्ये तैनात आहेत. तिचा भाऊ रोहतकमध्ये MBBS इंटर्नशिप करत आहे. कल्पनाचे आजोबा दयाराम गावडचे सरपंच होते.