जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग 27 लढाऊ विमान कोसळलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 13:22 IST2019-03-31T13:21:42+5:302019-03-31T13:22:33+5:30

राजस्थानच्या जोधपूरमध्ये वायुसेनेचे विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वायुसेनेच्या मिग- २७ लढाऊ विमान एका रुटीन मिशनदरम्यान कोसळलं आहे.

Mig 27 Upg Aircraft On A Routine Mission From Jodhpur Crashed | जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग 27 लढाऊ विमान कोसळलं 

जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग 27 लढाऊ विमान कोसळलं 

जोधपूर - राजस्थानच्या जोधपूरमध्ये वायुसेनेचे विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वायुसेनेच्या मिग- २७ लढाऊ विमान एका रुटीन मिशनदरम्यान कोसळलं आहे. सिरोही जिल्ह्यातल्या शिवगंज येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळावर वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. पायलटची स्थिती काय आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरु आहे. 


याआधीही राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात वायुसेनेचे मिग 21 लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना घडली होती, त्यावेळी पायलटने पॅराशूटच्या सहाय्याने आपला जीव वाचवला होता. 
 

Web Title: Mig 27 Upg Aircraft On A Routine Mission From Jodhpur Crashed