हिमाचल प्रदेशात हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले, पायलट बेपत्ता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:55 IST2018-07-18T14:42:27+5:302018-07-18T14:55:28+5:30

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली. 

MiG-21 Indian aircraft coming from Punjab's Pathankot has crashed in Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशात हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले, पायलट बेपत्ता  

हिमाचल प्रदेशात हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले, पायलट बेपत्ता  

कांगडा : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कांगडा जिल्ह्यातील जवाली भागात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळले. भारतीय हवाई दलाचे हे विमान पंजाबच्या पठाणकोटहून निघाले होते. विमानाचा पायलट बेपत्ता असून त्याचा शोघ घेणे सुरू आहे. घटनास्थळी बचाव पथकाने मदत कार्य सुरू केले आहे.




दरम्यान, एकीकडे विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्यानंतर पायलट विमान अपघात होण्याआधीच पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  



 

 


 

Web Title: MiG-21 Indian aircraft coming from Punjab's Pathankot has crashed in Himachal Pradesh