दिल्लीहून मँचेस्टरला (यूके) जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाला मध्य आशियातील वाढत्या तणावाचा जबरदस्त फटका बसला. इंडिगोचे उड्डाण '6E 033' इथिओपियाच्या सीमेजवळ पोहोचले असताना अचानक हवेतूनच माघारी फिरले. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुमारे ७ तासांच्या प्रवासानंतर हे विमान पुन्हा भारतीय हवाई क्षेत्रात दाखल झाले.
नेमकं काय घडलं? -'फ्लाइटराडार २४' या विमान ट्रॅकिंग सेवेनुसार, दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर हे विमान इथिओपियाच्या हवाई क्षेत्राजवळ पोहोचले होते. २६ फेब्रुवारीनंतर या मार्गावरील इंडिगोचे हे पहिलेच उड्डाण होते. दिल्ली ते मँचेस्टर हे अंतर साधारण ६,८२९ किलोमीटर असून यासाठी सरासरी ११ तास लागतात. मात्र, ७ तासांचा प्रवास पूर्ण झालेला असतानाच विमानाला यू-टर्न घ्यावा लागला.
विमान माघारी का फिरलं? -इंडिगोने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, मध्य आशियातील बदलत्या परिस्थितीमुळे शेवटच्या क्षणी हवाई क्षेत्रावर (Airspace) निर्बंध लादण्यात आले. "आमच्या ग्राहकांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे विमान ६ई ०३३ ला पुन्हा मूळ स्थानी परतावे लागले," असे इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले.
हवाई क्षेत्रावर निर्बंध -विमान कंपनीनुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे काही विमानांना दूरच्या मार्गाने (Long Route) प्रवास करावा लागू शकतो किंवा मार्ग बदलावा लागू शकतो. प्रवाशांचा प्रवास पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
Web Summary : An Indigo Delhi-Manchester flight returned mid-air near Ethiopia due to Middle East tensions and airspace restrictions. Passengers faced disruption after a 7-hour flight. Indigo cited safety as the priority, working to resume travel.
Web Summary : मध्य पूर्व तनाव और हवाई क्षेत्र प्रतिबंधों के कारण इंडिगो की दिल्ली-मैनचेस्टर उड़ान इथियोपिया के पास से वापस लौटी। 7 घंटे की उड़ान के बाद यात्रियों को व्यवधान का सामना करना पड़ा। इंडिगो ने सुरक्षा को प्राथमिकता बताया, यात्रा फिर से शुरू करने के लिए काम कर रही है।