इराणवरील हल्ल्याची पीएम मोदींना आधीच कल्पना होती? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:44 IST2026-04-02T18:43:45+5:302026-04-02T18:44:12+5:30

Middle East Tensions: पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इस्त्रायल दौऱ्यावर होते.

Middle East Tensions: Did Prime Minister Modi already know about the attack on Iran? Big revelation from the central government; Know More | इराणवरील हल्ल्याची पीएम मोदींना आधीच कल्पना होती? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; जाणून घ्या...

इराणवरील हल्ल्याची पीएम मोदींना आधीच कल्पना होती? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; जाणून घ्या...

Iran War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इस्त्रायल दौऱ्यानंतर इराणवर झालेल्या हल्ल्याबाबत भारताला पूर्वकल्पना होती का, या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, इराणवरील हल्ल्याबाबत इस्त्रायलने भारताशी कोणतीही पूर्व चर्चा केली नव्हती आणि या कारवाईची माहिती भारत सरकारला आधीपासून नव्हती.

मोदींचा इस्त्रायल दौरा आणि करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इस्त्रायल दौरा केला होता. हा त्यांचा इस्त्रायलमधील दुसरा महत्त्वाचा दौरा होता. यापूर्वी जुलै 2017 मध्ये त्यांनी इस्त्रायलचा ऐतिहासिक दौरा केला होता, जो कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा पहिला अधिकृत इस्त्रायल दौरा होता. या दौऱ्यात भारत आणि इस्त्रायल यांच्यात AI, सायबर सुरक्षा, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये एकूण 16 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दौऱ्यानंतर इराणवर हल्ला

पंतप्रधान मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यानंतर काही दिवसांनी, 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर भारताला या हल्ल्याची पूर्व माहिती होती का, याबाबत राजकीय आणि राजनैतिक स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सरकारने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

युद्ध लवकरच थांबणार?

इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणची अणु क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून, येत्या काही दिवसांत युद्ध संपण्याची शक्यता आहे. तसेच इराणकडून युद्धविरामाची मागणी करण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला होता. 
मात्र, इराणने ट्रम्प यांचे सर्व दावे फेटाळून लावले असून कोणत्याही दबावाखाली झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

नाटो देशांचा अमेरिकेला पाठिंबा नाही

या संघर्षात अमेरिकेला नाटो देशांचा अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचेही समोर आले आहे. युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि स्पेनसह अनेक देशांनी उघडपणे समर्थन देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करत नाटोमधून बाहेर पडण्याचाही विचार करू शकतो, असे वक्तव्य केले आहे.

Web Title : ईरान पर हमले की भारत को जानकारी नहीं, मोदी की इजराइल यात्रा के बाद सरकार का स्पष्टीकरण।

Web Summary : पीएम मोदी की इजराइल यात्रा के बाद ईरान पर हमले के बारे में भारत को पहले से जानकारी नहीं थी, सरकार ने स्पष्ट किया। इजराइल ने भारत के साथ इस कार्रवाई पर चर्चा नहीं की। अमेरिका को नाटो का समर्थन नहीं।

Web Title : India unaware of Iran attack, clarifies government after Modi's Israel visit.

Web Summary : India was not informed beforehand about the Iran attack following PM Modi's Israel visit, the government clarified. Israel did not discuss the action with India. No NATO support for US.