PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 20:03 IST2026-03-19T20:02:53+5:302026-03-19T20:03:31+5:30

मध्यपूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Middle East Crisis: PM Modi's talks with the heads of three countries; What did he say about the conflict in the Middle East..? | PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..?

PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..?

Middle East Crisis: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी(दि.१९) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ओमानचे सुल्तान हैथम बिन तारिक आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत प्रादेशिक संघर्ष कमी करून शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही नेत्यांशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून तणाव कमी करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच हॉर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित आणि अखंड तेल आणि गॅसवाहून जहाजांचे परिचालन अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ओमानचे सुल्तान हैथम बिन तारिक यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ओमानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा निषेध पुन्हा व्यक्त करत भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, मध्यपूर्वेतील संघर्ष सुरू झाल्यानंतर सुल्तान यांच्याशी मोदी यांची ही दुसरी चर्चा आहे.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी बोलताना मोदी यांनी ईद-उल-फितरच्या शुभेच्छा दिल्या आणि मध्यपूर्वेतील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत शांततेसाठी संवाद आवश्यक असल्याचे सांगितले. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेत या संघर्षाबाबत जागतिक पातळीवरील चिंतेवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, हा संघर्ष सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, इस्रायल आणि इराणसह अनेक देशांच्या नेत्यांशीही चर्चा केली आहे.

Web Title : मध्य पूर्व संकट: पीएम मोदी ने तीन नेताओं के साथ संघर्ष पर चर्चा की

Web Summary : पीएम मोदी ने फ्रांस, ओमान और मलेशिया के नेताओं से मध्य पूर्व तनाव पर बात की। उन्होंने संवाद के माध्यम से तनाव कम करने, होर्मुज जलडमरूमध्य की सुरक्षा पर जोर दिया और ओमान और मलेशिया को ईद की शुभकामनाएं दीं।

Web Title : Middle East Crisis: PM Modi Discusses Conflict with Three Leaders

Web Summary : PM Modi spoke with leaders from France, Oman, and Malaysia regarding Middle East tensions. He emphasized de-escalation through dialogue, the safety of Hormuz Strait, and conveyed Eid greetings to Oman and Malaysia.