शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

#MeToo: समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- अंतरा गांगुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:44 PM

समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले.

पुणे : मागील काही वर्षांत मुले व मुली असा समाजाकडून भेद करण्याच्या विचारांमध्ये बदल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पण हा बदल काही भागपुरताच दिसून येतो. अजूनही देशातील काही राज्यांमध्ये मुलींना सापत्न वागणूक मिळते. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात. मुलींना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जाऊ शकतात, हे सातत्याने दिसून येते. म्हणून मुलींनाही मुलांप्रमाणेच सन्मान मिळण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले. लोकमत वुमन समीटमधील ‘शाश्वत जीवन जगण्यासाठीची गुरुकिल्ली’ या दुसऱ्या सत्रामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.भारतात भारतातील मुला-मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये समान संधी दिली जात नाही. जैविकदृष्ट्या मुली मुलांपेक्षा अधिक सक्षम असतात. पण भारतात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जगण्याचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. मात्र मागील काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. दहा वर्षांत बालविवाहाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आले आहे. प्राथमिक स्तरावर अनेक भागात मुलींची शाळेतील उपस्थिती कमी असते. त्यामागे विविध कारणेही आहेत. गुजरातमध्ये एका गावात शाळा दूर असल्याने मुलींना जाता येत नव्हते. म्हणून मुलांनीच पुढाकार घेत मुली शाळेत गेल्या नाहीतस तर आम्हीही जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती, हे सकारात्मक चित्र आहे. मुलींप्रमाणेच मुलांवरही लैंगिक अत्याचार होतात. हे अत्याचार करणारे पुरुषच असतात. पण ‘मीटू’मध्ये काही पुरुषांनीही आपली कैफियत मांडली आहे. अनेक पुरुष याबाबत बोलत नाहीत. त्यासाठी समाजाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा.- अंतरा गांगुलीबांधकाम क्षेत्र हे महिलांसाठी नाही, असे महिलांना वाटते. पण आत्मविश्वास असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. माझे वडील बांधकाम क्षेत्रात असताना आजीने मलाही विरोध केला होता. लग्नानंतर पतीच्या व्यवसायातही सुरुवातीला अडचणी आल्या. पण हे तर आपले लहानपणापासूनचे स्वप्न असून त्याच्याकडे पाठ फिरवायची नाही, असे निश्चित करून पुन्हा काम सुरू केले. एक मालक म्हणून नव्हे, तर विद्यार्थी बनून कामात प्रगती करीत गेले. ‘गुड टच बॅड टच’ या मोहिमेअंतर्गत सुमारे इयत्ता आठवीच्या अडीच लाखांहून अधिक मुला-मुलींना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. पुढील वर्षी हा आकडा सहा लाखांच्या पुढे जाईल. हे प्रशिक्षण देत असताना शेवटी काही मुली आपल्या झालेल्या अत्याचाराची माहिती देत होत्या. अनेक घटनांमध्ये कुटुंबातील व्यक्तीच अत्याचारी होते. पण त्यामध्ये घरातील लोकच अशा घटना पुढे येऊ देत नसल्याचे अनुभवही आले. अनेक प्रकरणांमध्ये तर खूप भयानक प्रसंग मुलींकडून सांगितले जातात.- उषा काकडेदेशामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. हे केवळ मुलींसोबत नाही तर मुलांसोबतही होते. तसेच लैंगिक अत्याचाराची समस्या माध्यमे, राजकारण यांसह सर्व क्षेत्रांमध्ये आहे. ही एक मानसिक विकृती आहे. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांना पुढे यायला हवे.- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

टॅग्स :Metoo CampaignमीटूLokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८