विद्यार्थ्यांना निरोप
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:52+5:302015-02-14T23:51:52+5:30
जिजामाता आश्रम शाळा, हस्सापूर येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी निरोप देण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजीराव काकडे होते़ मुख्याध्यापक ए़ पी़ मोरे, एस़ एल़ गायकवाड, बी़ डी़ देवर्षे, प्रा़ पोहरे, चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेख आसमा, शेख शाहिस्ता, ज्ञानेश्वर कोकणे, योगेश माने, आफरोज पठाण, सतीश जायनुरे, दत्ता सांगवे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले़

विद्यार्थ्यांना निरोप
ज जामाता आश्रम शाळा, हस्सापूर येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी निरोप देण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजीराव काकडे होते़ मुख्याध्यापक ए़ पी़ मोरे, एस़ एल़ गायकवाड, बी़ डी़ देवर्षे, प्रा़ पोहरे, चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेख आसमा, शेख शाहिस्ता, ज्ञानेश्वर कोकणे, योगेश माने, आफरोज पठाण, सतीश जायनुरे, दत्ता सांगवे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले़ राष्ट्रीय सेवा योजना शिबीर- श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड यांच्याकडून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन येळेगाव ता़ अर्धापूर येथे करण्यात आले़ उद्घाटन प्रसंगी रमेशचंद्र महाजन, अशोक गव्हाणे, प्राचार्य हेमंत इंगळे, आनंदराव कपाटे, सरपंच कोंड्याबाई कपाटे उपस्थित होते़ विद्यार्थ्यांकडून गाव स्वच्छता, नाली सफाई, शोषखड्डे आदी कामे करण्यात आली़ तानाजी इबितवार यांना पुरस्कार - महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात येणारा म़ ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार सम्राट अशोक निवासी मतिमंद विद्यालयातील शिक्षक तानाजी इबितवार यांना जाहीर झाला़ पुरस्काराचे वितरण १७ फेब्रुवारी हडको येथे होणार आहे़ आपची विजयी रॅली- आम आदमी पार्टीच्या वतीने शनिवारी हबीब टॉकीज चौक ते डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत विजयी रॅली काढण्यात आली़ यावेळी राज्य कार्यकारी सदस्य फारूक अहेमद यांनी, आम आदमी पक्षाच्या विजयामध्ये लोकशाहीवादी जनतेच्या श्रमाचा वाटा असल्याचे सांगितले़ रॅलीत जिल्हा संयोजक नरेंद्रसिंघ ग्रंथी, सरोज पेठे, विजय राठोड, मोहनराव सिरसाठ, संजीव जिंदल, जावेद हाश्मी, मुंजाजी व्यवहारे, म़ कलीमोद्दीन , सुभाष कठारे, म़ कासीम, राजेश धनजकर, उबेद बा - हुसेन, केशव गजभारे, डॉ़ शेख अकबर, डेनियल नल्ला, शिवाजी पांढरे, म़ इरफान आदींनी सहभाग घेतला़