गळफास घेण्याचा मेसेज; पाेलिसांनी वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 05:29 IST2023-03-20T05:28:39+5:302023-03-20T05:29:26+5:30

पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेचे सर्व कौतुक होत आहे. 

Message of hanging; Police saved lives | गळफास घेण्याचा मेसेज; पाेलिसांनी वाचविले प्राण

गळफास घेण्याचा मेसेज; पाेलिसांनी वाचविले प्राण

नोएडा :  पत्नीच्या जाचामुळे आपण गळफास लावून आत्महत्या करीत आहोत असा इन्स्टाग्रामवर मेसेज लिहिलेल्या एका युवकाशी पोलिसांनी तातडीने संपर्क साधून त्याला हे कृत्य करण्यापासून परावृत्त केले. पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेचे सर्व कौतुक होत आहे. 

२३ वर्षे वयाच्या एका युवकाने इन्स्टाग्रामवर शनिवारी दुपारी दोन वाजता गळफासाचे एक छायाचित्र झळकविले व त्याखाली लिहिले की आज सर्वकाही संपणार आहे. उत्तर प्रदेश पोलिस महासंचालकांच्या मीडिया सेलला हा मेसेज दिसल्यानंतर त्यांनी तातडीने त्याबद्दल गौतम बुद्धनगर पोलिसांना माहिती दिली. या  युवकाच्या खात्यावरून त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

का घेतला निर्णय?
आदल्या रात्री त्या युवकाचे आपल्या पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याने त्या भरातच आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याचे समुपदेशन करण्यात आले.

Web Title: Message of hanging; Police saved lives