कार्यकर्त्यांचे आबा (२)

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:07+5:302015-02-16T23:55:07+5:30

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अनेकदा ते कार्यकर्त्यांकडे जेवायला जायचे. पण, या गोष्टीचे त्यांनी कधीच राजकीय भांडवल केले नाही़ त्यांच्या याच मनमिळावू स्वभावामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळायचा अन् म्हणूनच आबा सत्तेत असले वा नसले तरी त्यांच्या सभोवताल गराडा पडायचा़ मराठी चित्रपट त्यांना आवडायचे. नागपुरात दोनदा ते आमच्यासोबत चित्रपट पहायला आले. जेवायला जाताना सुरक्षा रक्षकाला परत पाठवून द्यायचे. कुणालाही कळू द्यायचे नाही. खासगी गाडीत आमच्यासोबत यायचे. आबांना बघून हॉटेलवाला बिल घ्यायचा नाही़ पण, आबा जबरदस्तीने त्याला बिल घ्यायला लावायचे़ नागपूरचा एक कार्यकर्ता मुंबईत आबांना भेटायला गेला. त्याला आर्थिक अडचण होती. आबांनी मला फोन केला अजय पैसे द्या मी परत करील. १५ दिवसांनी मी गेलो तेव्हा आबांनी न विसरता मला पैसे परत केले. वाढदिवस्

Members' Association (2) | कार्यकर्त्यांचे आबा (२)

कार्यकर्त्यांचे आबा (२)

वाळी अधिवेशनाच्या वेळी अनेकदा ते कार्यकर्त्यांकडे जेवायला जायचे. पण, या गोष्टीचे त्यांनी कधीच राजकीय भांडवल केले नाही़ त्यांच्या याच मनमिळावू स्वभावामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळायचा अन् म्हणूनच आबा सत्तेत असले वा नसले तरी त्यांच्या सभोवताल गराडा पडायचा़ मराठी चित्रपट त्यांना आवडायचे. नागपुरात दोनदा ते आमच्यासोबत चित्रपट पहायला आले. जेवायला जाताना सुरक्षा रक्षकाला परत पाठवून द्यायचे. कुणालाही कळू द्यायचे नाही. खासगी गाडीत आमच्यासोबत यायचे. आबांना बघून हॉटेलवाला बिल घ्यायचा नाही़ पण, आबा जबरदस्तीने त्याला बिल घ्यायला लावायचे़ नागपूरचा एक कार्यकर्ता मुंबईत आबांना भेटायला गेला. त्याला आर्थिक अडचण होती. आबांनी मला फोन केला अजय पैसे द्या मी परत करील. १५ दिवसांनी मी गेलो तेव्हा आबांनी न विसरता मला पैसे परत केले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला १५ ऑगस्टला गडचिरोलीला जाण्यासाठी यायचे. यावेळी न चुकता रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमात जायचे. मुलांना भेटवस्तू द्यायचे. गडचिरोलीत नक्षल्यांच्या हल्ल्यात जवान जखमी झाले की न चुकता प्रत्येकवेळी नागपुरात जवानांना भेटायला यायचे, त्यांना हिंमत द्यायचे़ झुणका, भाकर, भरीत हे त्यांचे आवडीचे पदार्थ़
एक आठवण आणखी आहे़ खलाशी लाईनमधील एक मुलगा हरवला होता. अधिवेशन सुरू होते. पोलीस वेळ नाही म्हणत होते. ही गोष्ट आबांच्या कानावर आली़ आबांनी पोलीस यंत्रणेला कामाला लावले अन् तिसऱ्या दिवशी तो मुलगा सापडला. एकदा एक हॉटेल मालक मुंबईत लग्नपत्रिका घेऊन आला. त्याने एका बंद पाकिटात आबांसाठी महागडी डायमंड रिंग दिली अन् निघून गेला़ आबांच्या स्वीय सहायकांनी ही माहिती देताच आबांनी त्याच्याशी त्वरित संपर्क साधला व त्याला माघारी बोलावून ती रिंग त्याला परत केली़
एका हिवाळी अधिवेशनाच्या वेळी जपानी गार्डन येथे सायकल क्लबच्या उद्घाटनासाठी आबा आले होते. उद्घाटनप्रसंगी सर्वांनी आबांना सायकल चालविण्याचा आग्रह धरला. आबा लगेच सायकलवर बसले व झपाझप पॅडल मारत सेमीनरी हिल्सच्या रस्त्याने निघाले. आबा सायकलवर निघाल्याचे पाहून पोलीस मागे धावू लागले. पोलिसांचा ताफाही वेगात त्यांच्या मागे निघाला. हा क्षण कार्यकर्त्यांसह उपस्थितांना सुखावणारा होता. राज्याचे गृहमंत्री असूनही जमिनीवर वावरणारे आबा त्या वेळी प्रत्येकाने अनुभवले. आज ते या जगात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही़
(लेखक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आहेत.)

Web Title: Members' Association (2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.