मेघालयमध्ये चुरस वाढली, काँग्रेस-भाजपा दोघांचे सरकार स्थापनेचे दावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 21:04 IST2018-03-03T21:04:53+5:302018-03-03T21:04:53+5:30
मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तिथे कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

मेघालयमध्ये चुरस वाढली, काँग्रेस-भाजपा दोघांचे सरकार स्थापनेचे दावे
नवी दिल्ली - मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तिथे कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मेघालयमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मेघालयमधील त्रिशंकु विधानसभेची स्थिती लक्षात घेऊन भाजपानेही तिथे सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
कुठल्याही एका पक्षाला जनतेने बहुमताचा स्पष्ट कौल न दिल्यामुळे मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. मेघालयमध्ये सर्वाधिक आमदार असूनही गोव्यासारखी स्थिती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काँग्रेसने सकाळीच आपल्या तीन वरिष्ठ नेत्यांना मेघालयला पाठवले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मेघालयमध्ये आमदार ज्या पक्षाला पाठिंबा देतील त्यांचे सरकार बनेल असे म्हटले आहे. त्यामुळे मेघालयमध्ये राजकीय चुरस वाढली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल, कमलनाथ मेघालयमध्ये तळ ठोकून आहेत व सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.