रेल्वेची मेगाभरती! एक लाख नोकऱ्या देणार; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 07:04 IST2019-03-13T02:02:26+5:302019-03-13T07:04:43+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या जागा भरल्या जात असल्या तरी निवडप्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांना नोकऱ्या मिळेपर्यंत दिवाळी उरकून गेलेली असेल.

रेल्वेची मेगाभरती! एक लाख नोकऱ्या देणार; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा
नवी दिल्ली : रेल्वेमधील ‘ग्रुप डी, लेव्हल १’ मधील १,०३,७६९ पदे भरण्याची प्रक्रिया रेल्वे ‘रिक्रुटमेंट बोर्डा’ने (आरआरबी) मंगळवारी सरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या जागा भरल्या जात असल्या तरी निवडप्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांना नोकऱ्या मिळेपर्यंत दिवाळी उरकून गेलेली असेल.
विविध भागांत १८ प्रादेशिक रेल्वे रिक्रुटमेंट सेल असून उमेदवाराने आपल्या भागातील ‘आरआरसी’कडे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची वेबसाइट मंगळवार खुली झाली. अर्ज २६ एप्रिलपर्यंत करता येतील. ट्रॅक मेन्टेनर ग्रेड ४, विद्युत, यांत्रिकी व सिन्गल आणि दळणवळण या विभागांत सहाय्यक, सहाय्यक पॉईन्ट्समन वगैरे प्रकारची ही पदे आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३१ वर्षे असून, दहावी उत्तीर्ण तसेच ‘आयटीआय’ उत्तीर्ण वा अॅप्रेंटिसशिप यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अशी शैक्षणिक अर्हता आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या पदांचा पगार दरमहा १८ हजार रुपये आहे.
महत्त्वाच्या तारखा
१२ मार्च : अर्ज भरण्याची सुरुवात
१२ एप्रिल : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
१८ एप्रिल : पोस्ट व स्टेट बँकेतून शुल्क भरण्याचा शेवटचा दिवस
२३ एप्रिल : अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरण्याचा शेवटचा दिवस
२६ एप्रिल : शुल्कासह परिपूर्ण अर्ज दाखल करण्याची मुदत
सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ : संगणकावर लेखी परीक्षेचा कालावधी