प्रभागरचना निश्चितीच्या धोरणासंबंधी बैठक
By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:15+5:302015-07-08T23:45:15+5:30
नाशिक : महापालिकेत एकसदस्यीय प्रभागरचनेसंबंधी धोरण निश्चितीसाठी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे बैठक झाली. यावेळी नाशिकसह राज्यातील सहा महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

प्रभागरचना निश्चितीच्या धोरणासंबंधी बैठक
न शिक : महापालिकेत एकसदस्यीय प्रभागरचनेसंबंधी धोरण निश्चितीसाठी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे बैठक झाली. यावेळी नाशिकसह राज्यातील सहा महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. मार्च २०१७ मध्ये राज्यातील १० महापालिका, जिल्हा परिषदा आणि २९७ पंचायत समित्यांची मुदत संपत असून त्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बदलासंबंधी व धोरण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुंबईत बैठक बोलाविली होती. बैठकीत एकसदस्यीय प्रभागरचनेबरोबरच एकूणच निवडणूकविषयक चर्चा झाली. यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचेसह मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते.