दिल्लीस्फोटात मेरठच्या मोहसीनचा मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच नदीम दिल्लीला पोहोचला आणि मोहसीनचा मृतदेह त्याने थेट मेरठला आणला. पण जेव्हा मोहसीनची पत्नी सुलतानाला हे कळलं, तेव्हा ती तातडीने मेरठला पोहोचली. यानंतर मृतदेहासमोरच सासू-सुनेमध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं.
सुलताना हिने तिच्या पतीचे दिल्लीत अंत्यसंस्कार करण्याचा हट्ट केला. यामुळे तिची सासू संजीदा आणि दीर नदीम यांनी वाद घातला. खूप वेळ सुरू असलेल्या या भांडणानंतर अखेर दिल्लीत मोहसीनवर अंत्यसंस्कार करण्याचा करण्याचं ठरलं. त्यानंतर सुलताना मोहसीनचा मृतदेह दिल्लीला घेऊन गेली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
३२ वर्षीय मोहसीन मूळचा मेरठच्या न्यू इस्लामनगर येथे राहत होता. दोन वर्षांपूर्वी तो कुटुंबासह कामाच्या शोधात दिल्लीला गेला आणि तिथे ई-रिक्षा चालवू लागला. मोहसीनच्या कुटुंबात त्याची पत्नी सुलताना, १० वर्षांची मुलगी हिफ्जा आणि ८ वर्षांचा मुलगा अहद यांचा समावेश आहे. तो सध्या दिल्लीतील जामा मशिदीजवळील पट्टा मोहल्ला येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या सासरचे लोकही तिथेच राहतात.
"मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
सोमवारी संध्याकाळी मोहसीन लाल किल्ल्याकडे ई-रिक्षातून प्रवाशांना घेऊन जात होता. याच दरम्यान लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मेरठमध्ये आल्यानंतर सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी सुलताना देखील आली. तिने मृतदेह दिल्लीला नेण्याचा हट्ट केला. त्यानंतर जवळपास सहा तास भांडण सुरू होतं.
२६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
मोहसीनची आई संजीदा मुलाचा मृतदेह पाहून ढसाढसा रडली. मोहसीन दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नी आणि मुलांसह दिल्लीला गेला होता. मी त्याला दिल्लीत काम करण्यास मनाई केली होती. पण त्याची पत्नी दिल्लीची होती, म्हणून त्याने आमचं ऐकलं नाही. मोहसीनला त्याच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं होतं. पण आता तो आम्हाला सोडून गेला असं आईने म्हटलं आहे.
Web Summary : A Delhi blast killed Mohsin. His wife, Sultana, wanted the funeral in Delhi, clashing with his mother. After a long argument, the funeral was held in Delhi. Mohsin, a father of two, moved to Delhi for work.
Web Summary : दिल्ली विस्फोट में मोहसिन की मौत हो गई। पत्नी सुल्ताना दिल्ली में अंतिम संस्कार चाहती थी, जिससे माँ से विवाद हुआ। बहस के बाद, दिल्ली में अंतिम संस्कार हुआ। मोहसिन काम के लिए दिल्ली आया था।