Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:03 IST2024-11-20T18:02:46+5:302024-11-20T18:03:37+5:30
यूपीमध्ये विधानसभेच्या ९ जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. मीरपूर मतदारसंघातही मतदान सुरू आहे, मतदानादरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे.

Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
यूपीमध्ये विधानसभेच्या ९ जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. मीरपूर मतदारसंघातही मतदान सुरू आहे, मतदानादरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मीरपूरमधील एक SHO रिव्हॉल्व्हर दाखवून मतदारांना धमकावताना दिसत आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत.
निवडणूक आयोगाने मीरापूरच्या ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील SHO ला तात्काळ निलंबित करावं, कारण तो रिव्हॉल्व्हर दाखवून मतदारांना मतदान करण्यापासून रोखत असल्याचं सांगितलं. अखिलेश यादव यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी इब्राहिमपूरमध्ये महिलांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी अपमानास्पद भाषा आणि वर्तन करणाऱ्या SHO वर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी असं म्हटलं आहे.
मीरापुर के ककरौली थाना क्षेत्र के SHO को चुनाव आयोग तुरंत निलंबित किया जाए, क्योंकि वो रिवॉल्वर से धमकाकर वोटर्स को वोट डालने से रोक रहे हैं। @ECISVEEP@SECUttarPradesh@rajivkumarec@spokespersonECI@ceoup#ECI#YouAreTheOne#IVoteForSure#UPPolitics#SamajwadiPartypic.twitter.com/WfiygzqO0t
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 20, 2024
पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, भाजपाला ही पोटनिवडणूक मतांनी नव्हे तर खोटं बोलून जिंकायची आहे. पराभवाच्या भीतीने भाजपा प्रशासनावर दबाव आणत आहे. मी मतदारांना आवाहन करतो की, खंबीर राहा, या आणि मतदान करा.
समाजवादी पक्षाच्या मतदारांना मतदान करू दिलं जात नाही, फक्त जनताच यांच्या विरोधात नाही, तर त्यांचेच लोकही त्यांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागेल, मात्र या बेईमान अधिकाऱ्यांच्या विरोधात उद्या न्यायालयाचा निर्णय येईल. मला आशा आहे की, निवडणूक आयोग बेईमान अधिकाऱ्यांवर कारवाई करेल असंही ते म्हणाले.