शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
2
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
3
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
4
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
5
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
6
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
7
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
8
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
9
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
10
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
11
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
12
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
13
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
14
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
15
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
16
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
17
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
18
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
19
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
20
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न

'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:56 IST

MEA On Donald Trump Remarks: पाकिस्तानसोबत यापुढे फक्त दहशतवादी आणि पीओकेवर चर्चा होणार.

India Strong Message To Turkey: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने कडक तीव्र शब्दात सुनावले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी (22 मे) म्हटले की, पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा. भारताला अपेक्षा आहे की, तुर्की पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे आणि दहशतवादी यंत्रणेविरुद्ध कारवाई करावी, यासाठी जोरदार आग्रह करेल.

तिसऱ्या देशाची गरज नाहीभारत-पाकिस्तान तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर रणधीर जयस्वाल म्हणाले, मी माझ्या मागच्या संभाषणात म्हटले होते की, हा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तानचा आहे, यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही. चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही. आम्ही जम्मू-काश्मीरच्या कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानने पीओके परत करावेते पुढे म्हणतात, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आता यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा होणारा एकमेव मुद्दा म्हणजे पीओके रिकामा करणे. पाकिस्तानला पीओके परत करावाच लागेल. पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू पाणी करार निलंबित राहील. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान