आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 07:18 PM2019-08-29T19:18:23+5:302019-08-29T19:18:42+5:30

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे.

MEA condemn the recent statements by Pakistani leadership on matters internal to India | आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

googlenewsNext

नवी दिल्ली -  काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे. तसेच भारताच्या अंतर्गत प्रश्नांबाबत न बोलण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे.

 परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तानचा हेतू या भारातील परिस्थिती चिघळवण्याचा आहे. त्यासाठी पाकिस्तान कपोलकल्पित आणि आधारहीन गोष्टींच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच भारतात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न  आणि जिहादचे आवाहन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे, असा आरोपही परराष्ट्र मंत्रालयाने केला.



यावेळी दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवरही परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार टीका केली. पाकिस्तान दहशतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून करत असतो हे सर्वांना ठावूक आहे. याबाबत आम्ही पाकिस्तानला वारंवार समजावले आहे. त्यांच्याकडून भारतात घुसखोरी करवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे त्यांच्या देशात ज्या दहशतवादी संघटना आहेत .त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.'' असे रविश कुमार यांनी सांगितले.  

पाकिस्तानने भारतात ये-जा करण्यासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रविश कुमार  म्हणाले की, पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद करण्याबाबत कुठलीही अधिकृत सूचना दिलेली नाही,. तसेच कुलभूषण जाधव यांच्या हत्येप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. तसेच आम्ही कुलभूषण जाधव यांच्याशी संवाद साधण्यासाठी विनाअट कन्सुलर अॅक्सेस देण्याची मागणी आम्ही केली आहे.  

Web Title: MEA condemn the recent statements by Pakistani leadership on matters internal to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.