महापौरपदावर नाईक परिवाराचा वरचष्मा १२ वर्षे नाईकच महापौर : २० वर्षांत चार महिलांना संधी

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30

नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

Mayor of Naik family gets over 12 years Mayor: Four women get opportunity in 20 years | महापौरपदावर नाईक परिवाराचा वरचष्मा १२ वर्षे नाईकच महापौर : २० वर्षांत चार महिलांना संधी

महापौरपदावर नाईक परिवाराचा वरचष्मा १२ वर्षे नाईकच महापौर : २० वर्षांत चार महिलांना संधी

मदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेवर स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. पक्ष कोणताही असो सत्ता नाईकांचीच असे समीकरण तयार झाले आहे. १९९२ मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली व १९९५ मध्ये पहिली निवडणूक झाली. निवडणुकीनंतर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांची महापौरपदी वर्णी लागली. सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची लिम्का बुकमध्ये नोंद झाली होती. तेव्हा महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. यानंतर सुषमा दंडे यांना शिवसेनेने महापौर बनविले. त्यांनी कामकाजावर स्वतंत्र ठसा उमटविला होता. यानंतर नारायण राणे समर्थक चंदू राणे यांना सेनेने महापौर बनविले. दरम्यान, गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला व स्थानिक आघाडी तयार केली. या आघाडीच्या माध्यमातून विजया म्हात्रे व नंतर नाईक यांचे बंधू तुकाराम नाईक महापौर झाले. दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महापौरपद अडीच वर्षांसाठी राखीव झाले. पूर्ण पाच वर्षे संजीव नाईक यांनी महापौरपद भूषविले. याच काळात त्यांनी मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतला व पालिकेचा पाणीप्रश्न पुढील ५० वर्षांसाठी संपविला. मोरबे धरणासाठी त्यांचा कार्यकाळ कायमस्वरूपी लक्षात राहील.
तिसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचा पालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला. राष्ट्रवादीने मालमत्ता व पाणी बिलात २० वर्षे वाढ न करण्याची घोषणा केली. यामुळे पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. परंतु महापौरपद राखीव झाल्यामुळे नाईक यांचे महापौर होण्याचे स्वप्न भंगले. पहिल्या अडीच वर्षांत मनीषा भोईर व नंतर अंजनी भोईर यांना संधी देण्यात आली. पाच वर्षांच्या काळात दोन्ही महापौरांनी चांगले काम केले. याच काळात स्कूल व्हिजन, तलाव व्हिजन, उद्यान व्हिजनचा प्रश्न मार्गी लागला. ठाणे - बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण ही कामे मार्गी लागली. पालिका मुख्यालय, डॉ. आंबेडकर भवन, वंडर्स पार्क,रॉक गार्डन ही महत्त्वाची कामे याच काळात सुरू झाली. यामुळे पालिकेसाठी ही पाच वर्षे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक बिनविरोध निवडून आले व थेट महापौर बनले. त्यांच्या काळात पालिकेच्या क्रीडा विभागाचा कायापालट झाला. २२ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. महापौर मॅरेथॉनसह अनेक राज्यस्तरीय स्पर्धा सुरू झाल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली.

महापौर चौकट,नावाने दुसरी फाईल आहे

Web Title: Mayor of Naik family gets over 12 years Mayor: Four women get opportunity in 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.