Mayawati Says It Is Clear That PM Modi Amit Shah Targeting Mamata Banerjee | प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा 
प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा 

लखनऊ - पश्चिम बंगालमध्ये घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे. निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला शोभणारं नाही असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपावर केला आहे.


यावेळी बोलताना मायावती म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. मात्र हा प्रचार रात्री 10 वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत. जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली केल्याचा आरोपही मायावती यांनी लावला.  


 

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर ममता बॅनर्जी पदयात्रा काढणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही पश्चिम बंगालमध्ये मथुरापूर येथे प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी डमडम येथेही मोदींची सभा होणार आहे. बंगालमध्ये भाजपाने 23+ जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे. 

बंगालमधील डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण व कोलकाता उत्तर या नऊ ठिकाणी येत्या रविवारी मतदान आहे. प्रथेप्रमाणे तिथे प्रचार त्याच्या ४८ तास आधी म्हणजे १७ मे रोजी सायंकाळी बंद होणार होता. मात्र आता येथील जाहीर प्रचार १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच बंद करण्याचा आदेश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास तेव्हापासून प्रतिबंध असेल. तसेच सर्व ठिकाणी गुरुवारच्या रात्रीपासून संपूर्ण दारूबंदीही लागू होईल.Web Title: Mayawati Says It Is Clear That PM Modi Amit Shah Targeting Mamata Banerjee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.