"माझा नवरा नपुंसक, ५० लाखांसाठी त्यांनी आत्याला..."; मायावतींच्या भाचीचे सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:40 IST2025-04-10T19:35:12+5:302025-04-10T19:40:32+5:30
मायावती यांच्या भाचीने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

"माझा नवरा नपुंसक, ५० लाखांसाठी त्यांनी आत्याला..."; मायावतींच्या भाचीचे सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप
Mayawati Niece Dowry Harassment Case: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या कुटुंबांमध्ये सध्या मोठा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे पुतणे आकाश आनंद गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. आता मायावतींची भाचीही चर्चेत आली आहे. भाचीने तिच्या सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यासोबत पतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. माझा नवरा नपुंसक आहे, तो मला दुसऱ्याशी संबंध ठेवण्यास सांगत असल्याचे दावा मायावती यांच्या भाचीने केला.
मायावती यांच्या भाचीने तिच्या पती आणि सासरच्या सात जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा खटला दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने तिच्या सासू आणि नगरपालिका अध्यक्ष पुष्पा देवी, सासरे श्रीपाल, पती विशाल, मेहुणा भूपेंद्र उर्फ मोनू, मेहुणी निशा, शिवानी आणि मामा अखिलेश यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सासरचे लोक आत्यावर फ्लॅट आणि ५० लाख रुपये मागण्यासाठी दबाव आणत आहेत. यासाठी नकार दिला तेव्हा त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली, असे पीडितेने म्हटलं.
पीडितेचे लग्न ९ नोव्हेंबर २०२३ रोजी हापूरचे माजी आमदार श्रीपाल यांचा मुलगा विशाल याच्याशी झाला होते. लग्न झाल्यापासूनच तिचे सासरचे लोक हुंड्यासाठी आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मला गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे एक फ्लॅट आणि ५० लाख रुपये रोख देण्यास सांगण्यात आल्याचे मायावती यांच्या भाचीने तक्रारीमध्ये म्हटलं.
पीडितेचे सांगितले की, तिच्या सासरच्यांनी माझ्यावर दबाव आणला. "तुझी आत्या मायावती एक मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यामुळे त्या सहज हुंडा देऊ शकतात. जेव्हा मी याचा निषेध केला तेव्हा मला धमकावण्यात आले आणि खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकीही देण्यात आली. माझा पती लग्नापूर्वी स्टिरॉइड इंजेक्शन घेत होता ज्यामुळे तो नपुंसक झाला आणि ही वस्तुस्थिती माझ्यापासून लपवण्यात आली. पती नपुंसक असल्याने मुल होण्यासाठी मला दिराशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होतं," असा गंभीर आरोप मायवतींच्या भाचीने केला.
गेल्या महिन्यात पीडितेने तिच्यावर झालेला अत्याचार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी पीडितेला पोलीस ठाण्यात नेले, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही कारवाई झाली नाही. त्यामुळे पीडिता न्यायालयात गेली. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.