मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 10:56 IST2019-04-25T10:53:30+5:302019-04-25T10:56:00+5:30

उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारचे मंत्री सुरेश खन्ना यांनी शाहजहानपूरमध्ये प्रचारसभा घेतली.

Mayawati is fused transformer; What will she do? BJP ministers criticize | मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका

मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका

शाहजहानपूर : लोकसभेच्या सत्तेची चावी ही उत्तरप्रदेशमधून जात असल्याने तेथील राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते. यामुळे प्रचाराची पातळीही खालवलेली आहे. मुख्यमंत्र्यांपासून तेथील नेते टीका करताना भान विसरत चालले आहेत. आज मायावतींवरही उत्तरप्रदेशच्या एका मंत्र्याने टीका केली. 


उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारचे मंत्री सुरेश खन्ना यांनी शाहजहानपूरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी बसपाच्या सुप्रिमो मायावती यांच्यावर टीका केली. मायावती या उडालेल्या ट्रान्स्फॉर्मर आहेत. या खराब झालेल्या ट्रान्स्फॉर्मरला कोणीही तारा जोजल्या तरी त्यापासून ना बल्ब पेटणार नाही पंखा चालणार. ना पाणी मिळणार ना हवा लागणार. अशा उडालेल्या ट्रान्स्फॉर्मरचे काय करणार? अशी टीका केली आहे. 


उत्तरप्रदेशमध्ये गेल्या आठवड्यातच मायावती, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजपाच्य केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली होती. यानंतरही भाजपाच्या नेत्यांकडून, उमेदवारांकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरुच आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरेंना शाप दिल्याने सुतक संपल्याचे वक्तव्य केले होते. यावरून देशभरात संतापाची लाट उठली होती. शेवटी साध्वीने जर-तरच्या भाषेमध्ये माफी मागत असल्याचे म्हटले होते. 



 

Web Title: Mayawati is fused transformer; What will she do? BJP ministers criticize